फेडरेशन ऑफ़ हूमड़ जैन समाज संघटनेचा शपथविधी समारोह

राजकुमार शहा 
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

मोहोळ (सोलापूर) : फेडरेशन ऑफ़ हूमड़ जैन समाज या आंतरराष्ट्रिय जैन संघटनेच्या 5 क्षेत्रातील 12 राज्यातील कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांचा शपथविधी समारोह 5 ऑगस्ट रोजी बारामती येथील महावीर भवन येथे सकाळी 9 वा सम्पन्न होणार असून, या समारंभासाठी महाराष्ट्रासह  12 राज्यातील जैन बांधव मोठ्या संखेने उपस्थित राहणार असल्याची माहिती हूमड़ जैन संघटनेचे महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य मिहीर गांधी व हूमड़ जैन समाज महाराष्ट्र कार्यकारिणीचे माजी अध्यक्ष डॉ. श्रेणिक शहा यांनी पापरी (ता. मोहोळ) येथे दिली. 

या आंतरराष्ट्रिय संघटनेने 5 क्षेत्रात विविध राज्यात संघटन केले आहे. या शपथ विधी समारोहाला महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, पंजाब, चंदिगढ़, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ़, गुजरात, गोवा, आंध्रप्रदेश, आदि राज्यातील कार्यकारिणी व त्यातील पदाधिकाऱ्यांचा सत्कार व शपथ विधी समारोह होणार आहे. महाराष्ट्र माहिला कार्यकारिणीचाही शपथविधी समारोह संपन्न होणार आहे. 

महिला कार्यकारिणीच्या अध्यक्षा म्हणून सन्मती सेवा महिला दलाच्या निरा येथील सदस्या श्रीमती तनुजा शहा यांची, उपाध्यक्ष म्हणून सोलापूर येथील डॉ मंजूषा शहा,सचिव पदी अकलूज येथील सुरेखा फड़े,सह सचिव म्हणून सविता दोशी फलटण यांची, खजिनदार म्हणून अकलूज येथील श्रीमती  संज्योत व्होरा, तर  प्रसिद्धि प्रमुख म्हणून जेजुरी येथील वैशाली गांधी  यांची निवड करण्यात आली आहे.

याच कार्यक्रमाचे औचित्य साधुन पुणे येथील प्रसिद्ध वक़्ते चकोरभाई गांधी यांचे "काय जमाना बदलत चालला आहे का?"या विषयावर व्याख्यान होणार आहे.शपथ विधि समारोह यशस्वी होण्यासाठी बारामती येथील श्री मुनिसुव्रत महाराज दिगंबर जैन देवस्थानचे सर्व पदाधिकारी, सन्मती सेवा दलाचे  अध्यक्ष डॉ राजेश शहा यांचे कार्यकारिणी मंडळ सर्व ठिकाणचे संचालक, सभासद परिश्रम घेत आहेत.

आंतरराष्ट्रीय  संघटनेचा महाराष्ट्रासह इतर 12 राज्यतील जैन समाजाच्या कार्यकारिणीचा शपथविधि होणारा हा पहिलाच कार्यक्रम असल्याचेही गांधी यांनी सांगितले.या शपथविधि समारंभा निमित्त विविध राज्यातून आलेल्या जैन बांधव व महाराष्ट्रातील जैन बांधव  यांच्यात चर्चा  होवून समाजातील विविध प्रश्न अडचणी यावरही विचारमंथन होणार आहे.फेडरेशन ऑफ़ हूमड़ जैन समाज माहाराष्ट्र कार्यकारिणीचे  अध्यक्ष सुशिल शहा दौंड हे ही या कार्यक्रमात जैन बांधवांना  मार्गदर्शन करणार असल्याचे गांधी यांनी सांगितले.