दुष्काळी माण तालुक्‍यात 14 उमेदवार कोट्यधीश 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

मलवडी - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मैदानात उतरलेल्या उमेदवारांपैकी आंधळी गटातील कॉंग्रेसचे उमेदवार दुर्योधन सस्ते यांच्याकडे 22 कोटींची मालमत्ता आहे. भाजपच्या कुकुडवाड गटातील उमेदवार सुवर्णा देसाई यांच्याकडे 19 कोटींची मालमत्ता आहे. एकूण उमेदवारांपैकी तब्बल 14 उमेदवार कोट्यधीश आहेत. 

मलवडी - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मैदानात उतरलेल्या उमेदवारांपैकी आंधळी गटातील कॉंग्रेसचे उमेदवार दुर्योधन सस्ते यांच्याकडे 22 कोटींची मालमत्ता आहे. भाजपच्या कुकुडवाड गटातील उमेदवार सुवर्णा देसाई यांच्याकडे 19 कोटींची मालमत्ता आहे. एकूण उमेदवारांपैकी तब्बल 14 उमेदवार कोट्यधीश आहेत. 

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी अर्जासोबत जोडलेल्या विवरणपत्राच्या माध्यमातून त्यांच्या स्थावर व जंगम मालमत्तेची माहिती पुढे आली आहे. श्री. सस्ते व सौ. देसाई यांच्याव्यतिरिक्त गोंदवले बुद्रुक गटातील कॉंग्रेसच्या उमेदवार राजश्री पोळ यांच्याकडे पाच कोटी 77 लाख 98 हजार इतकी मालमत्ता आहे. पोळतात्यांच्या स्नुषा मार्डी गटातील राष्ट्रवादीच्या उमेदवार सोनाली पोळ यांच्याकडे तीन कोटी दहा लाख 62 हजार, तर दुसऱ्या स्नुषा गोंदवले बुद्रुक गटातील राष्ट्रवादीच्या उमेदवार भारती पोळ यांच्याकडे दोन कोटी दहा लाख इतकी मालमत्ता आहे. वरकुटे म्हसवड गणातील "रासप'च्या उमेदवार लतिका वीरकर यांच्याकडे एक कोटी 51 लाख, कुकुडवाड गटातील राष्ट्रवादीच्या उमेदवार कांचनमाला जगताप यांच्याकडे एक कोटी 46 लाख, अपक्ष उमेदवार लता आटपाडकर यांच्याकडे एक कोटी 93 लाखांची मालमत्ता आहे. बिदाल गटातील कॉंग्रेसचे उमेदवार अरुण गोरे यांच्याकडे एक कोटी 41 लाख, मार्डी गणातील राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश पाटोळे यांच्याकडे एक कोटी 43 लाखांची मालमत्ता आहे. एक कोटीच्या आसपास मालमत्ता असणारे काही उमेदवार आहेत. सातारा जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असणारा माण तालुका कोट्यधीश उमेदवारांमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. 

कुकुडवाड गणातील तीनही उमेदवार गडगंज 
माण तालुक्‍यातील कुकुडवाड गणातील तीनही उमेदवार कोट्यधीश आहेत. साहेबराव काटकर यांच्याकडे तीन कोटी चार लाख, सतीश काटकर यांच्याकडे एक कोटी 56 लाख, तानाजी काटकर यांच्याकडे एक कोटी 55 लाख इतकी मालमत्ता आहे.

Web Title: 14 candidates millionaire in maan