पिकअप अपघातामध्ये 14 शेळ्यांचा मृत्यू, चार जण जखमी

राजकुमार थोरात
मंगळवार, 3 जुलै 2018

वालचंदनगर : कळस (ता.इंदापूर) जवळील वायाळवस्ती येथे चारचाकी पिकअपचा अपघातामध्ये चार नागरिक जखमी झाले असून 12 शेळ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी पिकअपचा चालक दिनकर कदम यांच्यावर भरधाव वेगाने वाहन चालवून अपघातस कारणीभुत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

याप्रकरणी दादाराम संभाजी खारतोडे (रा.कळस) यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आज मंगळवार (ता.3) रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एम.एच. 10 अे.क्यू 1192 या पिकमधून चौघे जण पंधरा शेळ्या व बोकड घेवून राशीनहुन सांगली कडे निघाले होते. 

कळसजवळील वायाळवस्ती येथे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या बाजुला खड्यात जावून पलटी झाली. या अपघातामध्ये प्रकाश हनुमंतराव कांबळे व अनिल बाबु मुंढे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बारामती येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. संभाजी केरबा बेंद्रे व बबन दत्तात्रेय इंगवले हे किरकोळ जखमी झाले. या अपघातामध्ये 9 शेळ्यांचा व 3 बोकडांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी गाडीचा चालक दिनकर कदम याच्यावर गुन्हा दाखल केला असून साहय्यक फौजदार संदीपान वीर तपास करीत आहे.

Web Title: 14 goats die in pick-up accident, four injured