सांगलीत कोरोनाचे नवे 14 रुग्ण; 27 कोरोनामुक्त 

14 new patients of Sangli corona; 27 coronal free
14 new patients of Sangli corona; 27 coronal free

सांगली : जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाचे 14 नवे रुग्ण आढळून आले. तर 27 जण कोरोनामुक्त झाले. महापालिका क्षेत्रातील तिघांना बाधा झाली. बाधितांची संख्या 48 हजार 17 झाली आहे. 

आज 351 जणांची आरटीपीसीआर तपासणी झाली. त्यात आठ बाधित आढळले. 441 जणांची अँटीजेन तपासणी करण्यात आली. त्यात 7 जण बाधित आढळले. आटपाडी तालुक्‍यात 1, जत तालुक्‍यात 2, कडेगाव तालुक्‍यात 3, कवठेमहांकाळ तालुक्‍यात एक, मिरज तालुक्‍यात एक, तासगाव तालुक्‍यात एकास बाधा झाली. महापालिका क्षेत्रातील सांगलीतील दोन, मिरज शहरातील एकास बाधा झाली. 

परजिल्ह्यातील एकास उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. एकूण बाधितांची संख्या 1541 इतकी असून त्यापैकी 1309 रुग्ण बरे झाले आहेत. गृहअलगीकरणात 68 रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णालयात 66 जण उपचार घेत आहेत. 

सध्याची स्थिती अशी ः आजचे बाधित ः 14, उपचाराखाली ः 143, बरे झालेले ः 46 हजार 128, मृत्यू ः 1746, बाधित ः 48 हजार 017, चिंताजनक 36, ग्रामीण बाधित ः 24 हजार 299, शहरी बाधित ः 7 हजार 163, मनपा क्षेत्रात बाधित 16 हजार 555. 

जिल्ह्यात आज 14 रुग्ण नव्याने कोरोनाबाधित झाले. त्यामुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या 48 हजार 017 झाली आहे. 
तालुकानिहाय कोरोनाबाधित 

आटपाडी : 2485 
जत : 2260 
कडेगाव : 2945 
कवठेमहांकाळ : 2471 
खानापूर : 2955 
मिरज : 4533 
पलूस : 2628 
शिराळा : 2291 
तासगाव : 3406 
वाळवा : 5488 
महापालिका : 16555 
एकूण 48 हजार 017 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com