दर्शनासाठी १५ मोठे पडदे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

पंढरपूर - आषाढी वारीच्या वेळी येणाऱ्या सर्वच भाविकांना गर्दीमुळे श्री विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेणे शक्‍य होत नाही. हे लक्षात घेऊन दर्शन रांगेत एलसीडी, तर शहरात विविध १५ ठिकाणी मोठ्या पडद्यांवर श्री विठ्ठलाच्या गाभाऱ्यातील थेट प्रक्षेपणाद्वारे भाविकांना दर्शनाचा आनंद देण्याची यंत्रणा उभी करण्यात येणार आहे. 

वारीसाठी येणाऱ्या भाविकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सर्व प्रयत्न मंदिर समितीच्या माध्यमातून केले जाणार आहेत, अशी माहिती श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. राज्यभरातील एक हजार स्वयंसेवक यात्राकाळात पंढरपुरात राहून स्वच्छतेचे काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आषाढी यात्रेच्या नियोजनासाठी श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीची बैठक आज दुपारी भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर त्यांनी यात्रेच्या नियोजनाविषयी माहिती दिली. ‘यंदाची आषाढी ही स्वच्छता, दर्शन व्यवस्था आणि जास्तीत जास्त चांगल्या सुविधा उपलब्ध असणारी होईल, असे नियोजन केले आहे. वारीसाठी १२ ते १४ लाख भाविक पंढरपूरला येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे. सर्वच भाविकांना गर्दीमुळे मंदिरात जाऊन दर्शन घेता येत नाही, हे लक्षात घेऊन दर्शन रांगेत एलसीडी बसवण्यात येणार आहेत. शहरात १५ ठिकाणी स्क्रीनवर श्री विठ्ठलाच्या गाभाऱ्यातील थेट प्रक्षेपण दाखवण्यात येईल. त्याद्वारे भाविकांना दर्शनाची व्यवस्था केली जाणार आहे. त्याच ठिकाणी प्रसाद व पिण्याच्या पाण्याची व्यवस्थादेखील असेल.

आषाढीत दर्शन रांगेत एलसीडी, तर १५ ठिकाणी मोठ्या स्क्रीनवर श्री विठ्ठल दर्शन
टोकनद्वारे दर्शन व्यवस्था आषाढीत गर्दीमुळे नाही 
आषाढी एकादशीदिवशी संतपीठ भूमिपूजन अथवा बृहत आराखड्याचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार
भक्तनिवासचे काम अपूर्ण असल्याने उद्‌घाटन आषाढीनंतर

Web Title: 15 big screens for vitthal darshan