तीन तालुक्‍यांतील 15 ग्रामपंचायती अस्वच्छ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

सातारा  - जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत पावसाळ्यात साथरोग पसरू नयेत, यासाठी विविध उपाययोजना आखल्या गेल्या. त्याअंतर्गत ग्रामपंचायतींच्या जलस्त्रोत, उद्‌भवांची तपासणी केली गेली. त्यामध्ये पाणीपुरवठा स्त्रोतांजवळ अस्वच्छता, हलगर्जीपणा दिसल्याने जिल्ह्यातील 15 ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड दिले आहे. 

पाणी व स्वच्छता मिशन विभागातील पाणी गुणवत्ता व स्वच्छता विभागामार्फत वर्षातून दोनदा सर्व्हे केला जातो. ग्रामपंचायत, आरोग्य विभागाच्या वतीने पावसाळ्यापूर्वी त्याची पाहणी करून सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले जातात. पिवळे कार्ड मिळालेल्या ग्रामपंचायतींमध्ये सुधारणा व्हाव्यात, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत गटविकास अधिकाऱ्यांना पत्रे पाठविण्यात आली आहेत. गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता यांच्यामार्फत संबंधित ग्रामपंचायतींना नोटिसा दिल्या आहेत. या सर्वेक्षणात 1,485 ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड मिळाले असून, कोणत्याही ग्रामपंचायतीस लाल कार्ड मिळाले नाही, ही बाब आशादायक आहे. 

...म्हणून मिळते पिवळे कार्ड 
जलस्त्रोतांभोवती अस्वच्छता, नळजोडणीला गळती, व्हॉल्व्हला गळती, नळाला तोट्या नसणे, अनियमित पाणी शुद्धीकरण, पाइपलाइनला गळत्या, ओढ्याजवळ जलस्त्रोत असल्यास तो परिसर अस्वच्छ असणे आदी कारणांमुळे पिवळे कार्ड दिले जाते. साताऱ्यातील तीन, जावळीतील दोन, खटाव, कऱ्हाडमधील प्रत्येकी पाच ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड दिले आहे. 

Web Title: 15 gram panchayats in three talukas are unclean