सातारा जिल्ह्याला हवीत १५ लाख पुस्तकं

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

‘प्राथमिक शिक्षण’ची बालभारतीकडे मागणी; अडीच लाख विद्यार्थी

सातारा - सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वाटप होणार आहे. जिल्ह्यातील दोन लाख ८१ हजार ९५० विद्यार्थ्यांना १५ लाख ३३ हजार २६७ पुस्तके मिळावीत, यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने बालभारतीकडे मागणी केली आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळा सुरू होताच ही पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. 

लाभाच्या वस्तूची रक्कम थेट लाभार्थींच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय सरकारने डिसेंबरमध्ये घेतला आहे. मात्र, यंदाच्या वर्षी त्यातून मोफत पाठ्यपुस्तक वाटप योजनेला मुख्यमंत्र्यांनी सूट दिली आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके मिळणार आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षाची सुरवात १५ जूनपासून होणार आहे. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तकांचे वाटप करण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. सर्व माध्यमांच्या अनुदानित, अंशतः अनुदानित, खासगी प्राथमिक शाळा, शासकीय शाळा, अंशतः अनुदानित माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ही मोफत पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. मराठी, कन्नड व उर्दू माध्यमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही पुस्तके मिळणार आहेत.

दरम्यान, यावर्षी सातवी आणि नववीचा अभ्यासक्रम बदलला असून, त्यातील सातवीची पुस्तके मोफत मिळणार आहेत. पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना खासगी वितरकाकडून पुस्तके घ्यावी लागणार नाहीत. प्राथमिक शिक्षण विभागाने बालभारतीकडे पाठ्यपुस्तकांची मागणी केली असून, जून महिन्यात ही पुस्तके शिक्षण विभागाकडे प्राप्त होतील. शाळेच्या पहिल्या दिवशी ही पुस्तके देण्याचे आयोजन केल्याची माहिती शिक्षण विभागातून देण्यात आली.

पाचवीपर्यंतची मागणी अशी - तालुकानिहाय विद्यार्थी (कंसात पुस्तके)- सातारा २५४५२ (१०७९९१), जावळी ५५६१ (२३४९६), महाबळेश्‍वर ३२०१ (१३५६४), वाई १०६३७ (४४४५०), खंडाळा ८९१४ (३७५५६), फलटण २२६१५ (९५१६०), माण १४९५९ (६३१३२), खटाव १५७५२ (६६१२३), कोरेगाव १४१९३ (५९२३८), कऱ्हाड ३१५४७ (१३२७४०), पाटण १५८५० (६४४६३), एकूण १६८६८१ (७०७९१३).

सहावी ते आठवीपर्यंतची मागणी अशी - तालुकानिहाय विद्यार्थी (कंसात पुस्तके)- सातारा १७३५३ (१२६७४९), जावळी ३७१० (२७२८८), महाबळेश्‍वर २२९२ (१७२४७), वाई ७०४२ (५०९९२), खंडाळा ५७५३ (४२७१५), फलटण १४२९९ (१०५०२४), माण ९८४६ (७१८०१), खटाव १०५९१ (७७५६३), कोरेगाव ९२८३ (६८२४६), कऱ्हाड २१६२० (१५४७८५), पाटण ११४५८ (८२९४७), एकूण ११३२६९ (८२५३५४).

Web Title: 15 lakh books for satara district