गॅस कटरने तिजोरी फोडून बँकेत पंधरा लाखाची चोरी

प्रशांत शेटे
बुधवार, 28 मार्च 2018

आष्टामोड येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाजूने असलेली खिडकी गॅस कटरच्या साह्याने तोडून चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला. स्ट्राँगरूमचे कुलुप तोडून तिजोरी ही फोडली व यातील 15 लाख 45 हजार रूपये लंपास केले.

चाकुर (जि. लातूर) - आष्टामोड (ता. चाकूर) येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेची तिजोरी गॅस कटरच्या साह्याने फोडून 15 लाख 45 हजार रूपयाचा एैवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना बुधवारी (ता. 28) सकाळी निदर्शनास आली आहे. 

आष्टामोड येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाजूने असलेली खिडकी गॅस कटरच्या साह्याने तोडून चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला. स्ट्राँगरूमचे कुलुप तोडून तिजोरी ही फोडली व यातील 15 लाख 45 हजार रूपये लंपास केले. चोरट्यांनी तिजोरी फोडण्यासाठी आणलेली गॅसचे सिलेंडर व इतर साहित्य त्याच ठिकाणी टाकले आहे. बुधवारी सकाळी कर्मचारी बँकेत आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. शाखा व्यवस्थापन श्री. शिंदे यांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक, पोलिस निरीक्षक रामेश्वर तट, पोलिस उपनिरीक्षक संतोष गित्ते यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दुपारी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते परंतू काहीही सुगावा लागलेला नाही. गॅस सिलेंडर व इतर साहित्यावरून ठसे घेण्यात आले असून शाखा व्यवस्थापनकांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाकूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती उपनिरीक्षक श्री. गित्ते यांनी दिली.

Web Title: 15 lakh of money stolen from bank by gas cutter