नागठाणे सरपंचांसह 15 सदस्य अपात्र

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 मार्च 2020

सांगली ः गंभीर आर्थिक अनियमिततेत दोषी आढळल्याने नागठाणे (ता. पलूस) ग्रामपंचायतीचे सरपंच आणि माजी सदस्य अशा पंधरा जणांना अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यांना पुढील सहा वर्षे निवडणूक लढवण्यासही बंदी घालण्यात आली आहे. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी हे आदेश दिले आहेत.

सांगली ः गंभीर आर्थिक अनियमिततेत दोषी आढळल्याने नागठाणे (ता. पलूस) ग्रामपंचायतीचे सरपंच आणि माजी सदस्य अशा पंधरा जणांना अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यांना पुढील सहा वर्षे निवडणूक लढवण्यासही बंदी घालण्यात आली आहे. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी हे आदेश दिले आहेत.

सन 2015 पासून नागठाणे ग्रामपंचायतीत झालेल्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी गावातील सुनिलसिंह माने आणि महादेव थोरात यांनी केली होती. त्यानुसार जिल्हा परिषद पातळीवर चौकशी करून कारवाईबाबतचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार तत्कालीन सरपंच, सदस्यांच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्यात आली. तत्कालीन सरपंच माधुरी जोशी यांनी कर्तव्यात दुर्लक्ष केले. दुराग्रहाने होळसांड केली. त्याला कुठल्याही सदस्याने विरोध केला नाही. सर्व सदस्यांची ही सामुहिक जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांना अपात्र ठरवण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला.

तक्रारदार सुनिल माने आणि महादेव थोरात यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे तक्रार केली होती, की 2015 मध्ये सत्ता आल्यानंतर तत्कालीन सरपंच आणि सदस्यांनी 14 व्या वित्त आयोगातील निधीचा व्यवस्थित विनियोग केला नाही. त्यात गैरव्यवहार झाला आहे. त्याची सविस्तर चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. या तक्रारीत ग्रामविकास अधिकारी रवींग्र घाटगे आणि संध्याराणी माने यांच्या कारभाराविषयीही तक्रार करण्यात आली होती.

त्याचीही चौकशी करण्यात आली असून आर्थिक अनियमिततेची जबाबदारी कुणाकुणाची किती आहे, याची निश्‍चित केली जाणार आहे. त्याची आधी खातेनिहाय चौकशी होईल. त्याचा अहवाल सीईओंसमोर सादर केला जाईल.

---------------------
 

सदस्यांची नावे अशी

पोपट शंकर शिंदे, भरत भिकाजी पाटील, गीतांजली महेश गुरव, माजी सरपंच माधुरी चंद्रकांत जोशी, कांचन लक्ष्मण शिंदे, जयश्री बाजीराव मांगलेकर, सरपंच सुरेश सुनिल भाडळकर, उपसरपंच झाकीरहुसेन बाबासाहेब लांडगे, उत्तम आबा बनसोडे, सुष्मा शरद जाधव, धनाजी जयसिंग पाटील, त्रिवेणी मोकाशी, अलका देवेंद्र कारंडे, सचिन वसंत शेळके आणि भीमराव रंगराव शिंदे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 15 members, including Nagathaei Sarpanchs, are ineligible