‘जलयुक्त’मधून १६ हजार कामे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

काशीळ - जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या कामामुळे अनेक गावे टंचाईमुक्त झाली आहेत. ‘जलयुक्‍त’मधून गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात १६ हजार ८४६ कामे पूर्ण झाली आहेत. या योजनेतील २०१८-१९ मधील कामांचा आराखडा तयार करून मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. 

काशीळ - जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या कामामुळे अनेक गावे टंचाईमुक्त झाली आहेत. ‘जलयुक्‍त’मधून गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात १६ हजार ८४६ कामे पूर्ण झाली आहेत. या योजनेतील २०१८-१९ मधील कामांचा आराखडा तयार करून मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. 

दुष्काळग्रस्त गावे पाणीटंचाईमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजना सुरू केली. निवड झालेल्या गावांत या योजनेतून सिमेंट नालाबांध, माती नालाबांध, सिमेंट बंधारे, वळण बंधारे, शेततळे, पाझर तलाव दुरुस्ती, सलग समतल चर, भूजल पुनर्भरण, ठिबक, तुषार सिंचन, दुरुस्ती, नदी पुनरुज्जीवन आदी कामे झाली. २०१५-१६ मध्ये २१५ गावांत सहा हजार ४७४ कामे निश्‍चित करण्यात आली होती. त्यावर्षी सर्वाधिक म्हणजे आठ हजार ४१८ कामे झाली. त्यासाठी १६४ कोटी दोन लाख खर्च झाले. २०१६-१७ मध्ये २१० गावांमध्ये पाच हजार ६६५ कामे झाली. या कामांवर १३९ कोटी २१ लाख रुपये खर्च झाले. २०१७-१८ मध्ये २१० गावांमधील तीन हजार ३७० कामांचा आराखडा तयार करण्यात आला. त्यापैकी दोन हजार ७६३ कामे पूर्ण झाली असून ४३६ कामे प्रगतिपथावर आहेत. या कामांवर आठ कोटी ६१ लाख खर्च केला गेला आहे. ‘जलयुक्‍त’मधून जिल्ह्यात आजपर्यंत १६ हजार ८४६ कामे पूर्ण झाली. २०१८-१९ मध्ये जिल्ह्यातील ९१ गावांची निवड केली असून, या गावांतील आराखडे तयार करून कामे मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहेत. मंजुरी मिळाल्यानंतर या कामांना सुरवात करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली.  

‘जलयुक्त’मध्ये नद्यांवरही बंधारे 
जलयुक्त शिवार अभियानातून खटाव तालुक्‍यातील येरळा, माण तालुक्‍यातील माणगंगा, कोरेगाव तालुक्‍यातील वांगणा, वसना, फलटण तालुक्‍यातील बाणगंगा या नद्यांवरील ब्रिटिशकालीन बंधाऱ्यांची दुरुस्ती तसेच सर्व नद्यांवर नवीन बंधारे बांधण्यात आले आहेत. जास्तीत जास्त पाणीसाठा होण्यासाठी या नद्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले आहे.

Web Title: 16 thousand works from jalyukt shivar yojana