चित्रपट महामंडळात १७ कारभारी !

संभाजी गंडमाळे
सोमवार, 3 डिसेंबर 2018

कोल्हापूर - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आगामी सर्वसाधारण सभेत घटना दुरुस्तीवर चर्चा होणार आहे. घटनेत दुरुस्ती झाल्यास महामंडळाचा कारभार येथून पुढे १७ कारभारी पाहतील. त्यात दोन उपाध्यक्षांचा समावेश असेल; तर निर्माता व दिग्दर्शक या विभागासाठी प्रत्येकी एक सदस्य संख्या वाढवली जाईल. त्याशिवाय ‘स्पेशल इफेक्‍ट’ हा स्वतंत्र विभाग करून या विभागासाठी एका सदस्याला प्रतिनिधित्व मिळेल. 

दरम्यान, सभेला अद्याप मुहूर्त मिळाला नसला तरी येत्या महिनाअखेर सभा घेण्याची लगीनघाई सुरू झाली आहे. २१ ऑक्‍टोबर ही सर्वसाधारण सभेची तारीख यापूर्वी जाहीर झाली. मात्र अहवालाचे काम पूर्ण न झाल्याने सभा पुन्हा पुढे ढकलण्यात आली. महामंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच १४ जागांसाठी तब्बल नऊ पॅनेल आणि १२० उमेदवार, अशी अटीतटीची निवडणूक एप्रिल २०१६ मध्ये झाली. मात्र त्यानंतर एकही सर्वसाधारण सभा झालेली नाही. 

या पार्श्‍वभूमीवर या सभेकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. एकूण मराठी चित्रपट व्यवसाय पाहता वर्षात आठवडे ५२ आणि सुमारे ९० ते ११० मराठी चित्रपटांची निर्मिती होते. सक्षम वितरण व्यवस्था नसल्याने अजूनही या चित्रपटांना प्रदर्शनासाठी वेटिंग लिस्टवर राहावे लागते. वितरण व्यवस्थेसह अनेक प्रश्‍नांवर सभेत चर्चा होणार आहे. त्याशिवाय, मागील तीन वर्षांच्या अहवालावरही चर्चा अपेक्षित आहे.

हॉल नाकारले...
चित्रपट महामंडळाच्या गेल्या काही वर्षातील सर्वसाधारण सभा प्रचंड गाजल्या. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत वादाचे प्रकारही घडले. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर शाहू स्मारक भवन आणि संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह व्यवस्थापनाने महामंडळाला सभेसाठी हॉलची परवानगी यापूर्वीच नाकारली आहे. त्यामुळे आता मार्केट यार्डातील शाहू सांस्कृतिक भवन हा एकमेव पर्याय सभेसाठी आहे. 

गठ्ठ्याने सभासद
महामंडळाची सर्वसाधारण सभा झाली नसली तरी सभासद होणाऱ्यांचे प्रमाण गेल्या दोन-तीन वर्षांत वाढले आहे. सभासद नोंदणी अर्जांचे गठ्ठेच महामंडळात येत असल्याच्या काहींच्या तक्रारी आहेत. या पार्श्‍वभूमीवर सभासद नोंदणीवरही सभेत चर्चा
 होणार आहे. 

Web Title: 17 members in the film corporation