सांगली जिल्ह्यात सकाळी 11 पर्यंत 17 टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

सांगली - जिल्ह्यात आज सकाळच्या टप्प्यात पावसामुळे मतदान संथगतीने होते. परंतू नंतर उघडीप दिल्यामुळे मतदानाची टक्केवारी थोडी वाढली. सकाळी अकरापर्यंत 17 टक्के मतदान झाले

सांगली - जिल्ह्यात आज सकाळच्या टप्प्यात पावसामुळे मतदान संथगतीने होते. परंतू नंतर उघडीप दिल्यामुळे मतदानाची टक्केवारी थोडी वाढली. सकाळी अकरापर्यंत 17 टक्के मतदान झाले. काही ठिकाणी मतदानासाठी रांग लागल्याचे चित्र दिसले. सोशल मिडियावरूनही मतदानाचा टक्का वाढवण्याबाबत आवाहन केले जात आहे.

सकाळी 11 पर्यंतची विधानसभा मतदारसंघ निहाय आकडेवारी अशी : मिरज- 13.68 टक्के, सागंली 16.99 टक्के, इस्लामपूर- 18.90 टक्के, शिराळा- 15.52 टक्के, पलूस-कडेगाव- 22.96 टक्के, खानापूर- 15.61 टक्के, तासगाव-कवठेमहांकाळ- 16.69 टक्के, जत- 16.84 टक्के याप्रमाणे मतदान टक्केवारी होती. जिल्ह्याची सरासरी टक्केवारी 11 पर्यंत 17.03 टक्के इतकी
होती.

सकाळी 11 नंतर पावसाने उघडीप दिल्यानंतर मतदार बाहेर पडत असल्याचे चित्र दिसून आले. मतदारांना बाहेर काढण्यासाठी कार्यकर्ते आवाहन करत आहेत. तसेच सोशल मिडियावर देखील मतदानाचा टक्का वाढवण्याबाबत आवाहन केले जात आहे.

दरम्यान, संततधार पावसामुळे तुंग येथील केंद्रावर ताडपत्री झाकण्यात आली होती. तर मिरजेतील सोनी केंद्रावर शुकशुकाट पाहायला मिळाला. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 17 percent voting till 11am in Sangli district

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: