रात्रभरात कोयनेच्या पाणीसाठ्यात पावणेदोन टीएमसीने वाढ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात रात्रीपासुन पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात सुमारे पावणे दोन टीएमसीने वाढ झाली आहे. कोयना धरणाची पाणी पातळी सकाळी 41.76 टीएमसी होती. रात्रीत सुमारे 1.76 टीएमसी पाणी साठ्यात वाढ झाली.

कऱ्हाड - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात रात्रीपासुन पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात सुमारे पावणे दोन टीएमसीने वाढ झाली आहे. कोयना धरणाची पाणी पातळी सकाळी 41.76 टीएमसी होती. रात्रीत सुमारे 1.76 टीएमसी पाणी साठ्यात वाढ झाली.

कोयनानगर, नवजा व महाबळेश्र्वरला रात्रभर पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर वाढल्याने धरणात काल दिवस भरात तीन टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. धरणाची पाणी पातळी पाच फुटाने वाढली आहे. जलाशयात आत्ता 41.76 टीएमसीचा पाणी साठा आहे.

कोयना जलाशयाचा पाणीसाठा पाणीपातळी 2096.10 फुट आहे. जलाशयात प्रतिसेकंद 35 हजार 088 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. शुक्रवारी रिमझिम पाऊस पडत होता. मात्र रात्रीपासुन पुन्हा पावसाची संततधार सुरु झाली. शनिवारी दिवसभर त्यात वाढच झाल्याने चोवीस तासात पाणी साठ्यात मोठा फरक पडला. काल रात्रभर कोयना नगरला 90 (1580) मिलीमीटर, नवजाला 125 (1466) तर व महाबळेश्र्वरला 97 (1305) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Web Title: 1.75 TMC water level increases in koyna dam in the night