बेळगावजवळ 18 लाखाचे मद्य जप्त

अमृत वेताळ
शुक्रवार, 4 मे 2018

बेळगाव - गोवा बनावटीचे 18 लाखाचे मद्य आज अबकारी खात्याने जप्त करून एकाला अटक केली. भवन मुर्जी गांधी (वय 38, रा. घर नं. 137 हनुमाण मंदिलजवळ मेघपार ता. भचौ जि. भोज) असे अटक झालेल्याचे नाव आहे. आज सकाळी सातच्या सुमारास खानापूर तालुक्‍यातील नंदगडजवळ ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात वापरलेला टेम्पो देखील जप्त केला आहे. हे मद्य बागलकोट जिल्ह्यातील लोकापूरला नेण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

गोव्याहून मोठ्या प्रमाणात बेकायदा मद्याची वाहतूक होत असल्याची खात्रीलायक माहिती अबकारी पोलिसांनी मिळाली होती. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून अबकारी अधिकाऱ्यांनी खानापूर नंदगड मार्गावर सापळा रचला होता. आज सकाळी 7 च्या सुमारास गोव्याहून येणारा एमएच 46 बीबी- 6293 हा टेम्पो अबकारी अधिकाऱ्यांनी अडविला. यावेळी टेम्पोत मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीचे मद्य आढळून आले. या मद्याची किंमत 18 लाख रूपये होत असल्याचे अबकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

या प्रकरणाची कसून चौकशी केली जात असून, जप्त करण्यात आलेले मद्य लोकापूर (जि. बागलकोट) येथे नेण्यात येत होते. अशी माहिती त्याने अबकारी अधिकाऱ्यांसमोर दिली आहे. निवडणुकीच्या काळातच या मद्याचा वापर होणार असल्याचे स्पष्ट झालेले असले, तरी त्याचा मालक कोण? याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. 

अबकारी सहआयुक्‍त गोपालकृष्ण गौड, अबकारी उपायुक्‍त अरुणकुमार के. यांच्या नेतृत्वाखाली अबकारी उपअधीक्षक विजयकुमार हिरेमठ, एन. सी. पाटील, अबकारी निरीक्षक लिंगराज के., सिध्दाप्पा मेटी, रविशंकर बी. एल आदींनी ही कारवाई केली

Web Title: 18 lacs liquor was seized near Belgaum