राज्यातील 18 हजार एसटी बसेस लवकरच एल एन जी गॅसवर धावणार

राज्यातील 18 हजार एसटी बसेस लवकरच एल एन जी गॅसवर धावणार

पंढरपूर- तोट्यातील एसटी महामंडळाला नफ्यात आणण्यासाठी लवकरच 18 हजार बसेसमध्ये आवश्यक ते तांत्रिक बदल करुन त्या एलएनजी गॅसवर चालवण्याचा निर्यण घेतला आहे. या निर्यणामुळे महामंडळाला दरवर्षी जवळपास 1 हजार कोटी रुपयांचा नफा होईल, अशी माहिती परिवहन मंत्री व राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष दिवकर रावते यांनी आज पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना दिली.

एसटी महामंडळाच्या वतीने विठ्ठल दर्शनासाठी येणार्या वारकऱ्यां राहण्याची व त्यांच्या भोजनासाठी सोय व्हावी या उद्देशाने पंढरपुरात महामंडळाच्या वतीने नवीन एसटी बसस्थानक आणि यात्रा निवास बांधण्यात येणार आहे. इमारत बांधकामाचे भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यापूर्वी त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लवकरच एसटी बस एलएनजीवर धावतील अशी माहिती दिली.

मंत्री रावते म्हणाले, डिझेलच्या वाढत्या खर्चामुळे एसटीला मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागतो. तरीही तोटा सहन राज्यातील प्रत्येक खेड्यात एसटीची सेवा सुरु आहे. यापुढच्या काळात एसटी वाचली पाहिजे या भूमिकेतूनच देशातील पहिला योजना सुरु करण्याचा निर्यण घेतला आहे. डिझेल किंमतीच्या चढ उतारामुळे एसटीला दरवर्षी किमान एक हजार कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. हा तोटा कमी करुन एसटीला उर्जितावस्था आणण्यासाठी यापुढे एलएनजीवर एसटी बस चालवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात 18 हजार एसटी बसेसमध्ये तांत्रिक बदल करावे लागणार आहेत. यासाठी एक एसटी बससाठी किमान 1 लाख 50 हजार रुपये खर्च आहे. येत्या काही महिन्यात राज्यातील विविध बस डेपोमधील सुमारे 18 हजार एसटी गाड्यांमध्ये तांत्रिक  बदल केले जातील. त्यानंतर एसटी बस एलएनजीवर धावतील. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास देखील कमी होईल. एसटी कर्मचार्यांच्या मुलांना शिक्षणासाठी 750 रुपये पाॅकेट मनी देण्याची योजना देखील सुरु केल्याची माहिती मंत्री रावते यांनी दिली.

विधान परिषदेत सभापतींनी ज्या पध्दतीने प्रशांत परिचारक निलंबनाचा विषय आणला तो चुकीचा होता. आपण जो सभागृहात जे बोललो ते योग्यच होते. परंतु सभापतीपद हे सर्वोच्च असल्याने आपण माफी मागितली. आजही माजी आमदार परिचारक भेटण्यासाठी आले होते. परंतु त्यांना आपण स्पष्टपणे सांगितले की, यापुढे त्या विषयावर बोलयाचे नाही. शिवेसेनाच सदस्य असता तरी आपण त्याला विरोध केला असता असेही मंत्री रावते यांनी आमदार प्रशांत परिचारक यांच्या निलंबन प्रकरणाविषयी सांगितले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, शहर प्रमुख रवी मुळे, जिल्हा परिषद सदस्या शैला गोडसे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com