आटपाडी तालुक्‍यात ग्राहकांची 19 कोटींवर वीज थकबाकी 

19 crore electricity arrears of customers in Atpadi taluka
19 crore electricity arrears of customers in Atpadi taluka

आटपाडी : दोन वर्षापूर्वी आटपाडी तालुक्‍यात वीज ग्राहकांची शून्य टक्के असलेली थकबाकी आज घरगुती आणि इतर 15 हजार 538 कनेक्‍शन धारकांची थकबाकी 19 कोटी पाच लाखापर्यंत पोचली आहे. या वसुलीचे महावितरण कार्यालयासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. 

आटपाडी तालुक्‍यात घरगुती कनेक्‍शन धारकांची संख्या 13 हजार 753, व्यवसायिकांची 938, उद्योजकांची 244, शासकीय कार्यालयाची 212, पिण्याच्या पाण्याचा पाणी पुरवठा करणारी 110 आणि स्ट्रीट लाईटची 261 कनेक्‍शन धारकांची संख्या आहे. 2019 मध्ये शेती वगळता सर्व वीज कनेक्‍शन धारकांची मार्चअखेर थकबाकी शून्य टक्के होती. 

गेल्यावर्षी कोरोनाची साथ पसरली. शासनाने लाक डाऊन जाहीर केला. त्यामुळे उद्योग व्यवसाय बंद पडले. अनेकांचा रोजगार गेला, त्यातच घरगुती कनेक्‍शन धारकांची विज माफीची घोषणा ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केले. त्यामुळे वर्षभर वीज ग्राहकांनी विज बिल भरले नाही. परिणामी विज बिल आणि थकबाकीचा आकडा रोजच वाढत गेला. 

गेल्या दोन महिन्यापासून वीज महावितरण कंपनीने विज बिल वसुलीची मोहीम सुरू केली आहे. 15 फेब्रुवारी रोजी ग्राहकांना नोटीस पाठवली. त्यानंतर लोकांची विज बिल दुरुस्ती करू भरण्यासाठी हालचाल सुरू झाली. मोठ्या प्रयत्नानंतर चार कोटी 38 लाख रुपये वीज थकबाकी जमा झाली आहे. मात्र, अद्याप 15538 ग्राहकांची वीज थकबाकी 19 कोटी पाच लाख अडकली आहे. त्याच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीचे अधिकारी विविध पातळीवर विविध प्रकारे प्रयत्न करीत आहेत. त्यांना अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नाही. त्यातच अधिवेशनात विजेच्या बिलासा प्रश्न गाजला आणि वीज बिल वसुली मोहिमेला ब्रेक लागला. आटपाडी तालुक्‍यात सध्या महावितरण कंपनी समोर थकबाकी वसुलीचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. 

तालुक्‍यातील 15 हजार 538 थकबाकी वीज ग्राहकांची एकूण थकबाकी 19 कोटी पाच लाख येणे बाकी आहे. त्यासाठी प्रबोधन करणे आणि प्रयत्न सुरू आहेत. ग्राहकाने वीज बिल भरून सहकार्य करावे. 
- संजय बालटे, सहाय्यक अभियंता, उपविभागीय कार्यालय, आटपाडी


संपादन : प्रफुल्ल सुतार 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com