दंगलीच्या गुन्ह्यातील 19 जणांना कोठडी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

नगर - बॅंकेतून पैसे काढण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या दोघांमध्ये झालेल्या वादातून जेऊर येथे गुरुवारी (ता. 15) झालेल्या दगडफेकप्रकरणी पोलिसांनी 19 जणांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. दरम्यान, याप्रकरणी परस्पर फिर्यादी दाखल झाल्या असून, गावात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिस बंदोबस्त आजही कायम होता.

सोमनाथ सुखदेव तवले (रा. जेऊर) यांच्या फिर्यादीनुसार सत्तार शेख, मुनीर शेख, महंमद शेख, हबीब पठाण, जाकिर शेख, दारुण शेख, अतुल लोंढे, वसीम शेख (सर्व रा. जेऊर बायजाबाई) यांना पोलिस उपनिरीक्षक देबडकर यांच्या पथकाने अटक केली. तर, शब्बीर खैरू शेख (रा. जेऊर) यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी सचिन ससे, गोरख आठरे, गणेश तवले, सागर मगर, शंकर तवले, गोरक्ष तवले, अजय तवले, सूरज ससे, प्रसाद पवार, सोमनाथ तवले (सर्व रा. जेऊर बायजाबाई) यांना उपनिरीक्षक नागवे यांच्या पथकाने अटक केली. परस्पराविरोधी फिर्यादींवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात 99 जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी काल दुपारपासूनच आरोपींची धरपकड सुरू केली.

जेऊरमध्ये दंगल नियंत्रण पथक व शीघ्र कृतिदलाचे जवान तळ ठोकून आहेत. पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे व सहायक पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Web Title: 19 people were arrested during the riots of crime

टॅग्स