दौंड मधून 19 हजार क्‍युसेकचा प्रवाह

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जुलै 2016

सोलापूर - सोलापूरकरांची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे दौंड मधून 19 हजार क्‍युसेकचा प्रवाह सोमवारी सायंकाळी सुरू झाला. त्यामुळे उजनीची पाणी पातळी आजपासून (मंगळवारी) वाढण्याची शक्‍यता आहे.

रविवारी बंडगार्डनमधून 18 हजार 221 क्‍युसेकचा प्रवाह उजनीमध्ये येत होता. तो सोमवारी सायंकाळपर्यंत काहीशा प्रमाणात कमी झाला. सोमवारी बंडगार्डनमधून दुपारी 16 हजार क्‍युसेकने पाणी धरणात येत होते. यात सायंकाळी पुन्हा घट झाली. सायंकाळी सहाच्या दरम्यान 14 हजार 542 क्‍युसेकचा प्रवाह बंडगार्डनमधून उजनीत येत होता. तर दुसरीकडे दौंडमधून येणाऱ्या पाण्यात सोमवारी वाढ झाली. दुपारी 12 वाजता चार हजार क्‍युसेकने येणारे पाणी सायंकाळी 19 हजार 500 क्‍युसेकने येऊ लागले होते. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या सातत्यामुळे दौंड आणि बंडगार्डनमधून येणाऱ्या पाण्यात वाढ होत आहे. पावसाचा मुक्काम कायम राहिला तर उजनी धरण लवकरच प्लसच्या दिशेने वाटचाल करणार आहे.

Web Title: 19 thousand kyusekaca flow from Daund Dam

टॅग्स