रंग पंढरीच्या वारीचे...!

रंग पंढरीच्या वारीचे...!

‘सकाळ’च्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त १ ऑगस्ट ते ३ ऑगस्ट दरम्यान  ‘रंग वारीचे’ या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. एकूणच या प्रदर्शनातील कलाकृती आणि छायाचित्रकारांविषयी...

‘सकाळ’चे कर्मचारी प्रकाश पाटील यांच्या कॅमेऱ्यातून बंदिस्त झालेल्या पंढरपूरच्या वारीचे विविध रंगही प्रदर्शनातून अनुभवायला मिळणार आहेत. श्री. पाटील मूळचे राशिवडे बुद्रुक (ता. राधानगरी) गावचे. शालेय शिक्षण गावातीलच परशुराम विद्यालयात झाले. त्यानंतर भोगावती महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण झाले. रा. शि. गोसावी कलानिकेतन महाविद्यालयातून त्यांचे कलाशिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी पेंटिंगबरोबरच फोटोग्राफीचा छंदही जोपासला. २०११ पासून ‘सकाळ’मध्ये ते आर्टिस्ट म्हणून रुजू झाले. त्यांची पेंटिंग जशी भुरळ घालतात, तशीच त्यांची छायाचित्रेही विविध विषयांवर नेमकेपणाने भाष्य करतात. यंदाच्या पंढरपूरच्या वारीत ते सहभागी झाले आणि वारीतील विविधांगी छायाचित्रे 
त्यांनी टिपली. 

खरं तर पंढरपूरचा विठोबा हा ‘कानडा’ आहे. कानडा म्हणजे अनाकलनीय. त्याचं स्वरूप आणि ज्ञान समजणं अत्यंत अवघड; पण हाच विठ्ठल जेव्हा लोकवाणीतून आपलं भावदर्शन घडवू लागला, तेव्हा त्याच्या भोळ्या भक्तिभावानं प्रसन्न होऊन जनमाणसाच्या अनुभवविश्वात प्रेमानं जाऊन बसला. त्याच्या भेटीसाठी आसुसलेले लाखो वारकरी पंढरपूरला पायी वारीने जातात आणि ही वारी आयुष्यात प्रत्येकाने अनुभवावी, अशीच. 
अर्थातच श्री. पाटील यांच्या कॅमेऱ्यात वारीत भावलेल्या अनेक प्रसंगांची छायाचित्रे बंदिस्त झाली आहेत. त्यातील काही निवडक छायाचित्रांचा प्रदर्शनात समावेश आहे. दिवे घाटापासून वारकऱ्यांसमवेत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास वारीतील अनेक परंपरांचा साक्षीदार ठरला. त्यांची छायाचित्रेही बोलकी आहेत. दरम्यान, त्यांच्या छायाचित्रांना आजवर कणेरी येथील अखिल भारतीय संस्कृती उत्सव, कोल्हापूर कला फाऊंडेशनच्या कला महोत्सवात विविध पारितोषिके मिळाली आहेत.  

 प्रदर्शनाचे स्थळ / वेळ 
नटश्रेष्ठ बाबूराव पेंढारकर कलादालन, 
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह.
१ ते ३ ऑगस्ट. सकाळी दहा ते सायंकाळी सात.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com