करमाळ्यातील स्लॅब कोसळल्याप्रकरणी दोन भावांना अटक

अण्णा काळे
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

बँकेच्या व्यवस्थापकांनी याबाबत करमाळा पोलिसात फिर्याद दिली आहे.
काल बुधवारी सकाळी अकरा वाजता बँक ऑफ महाराष्ट्राचे स्लॅब कोसळून दोन जणांचा मृत्यू, तर 21 जण जखमी झाले. अजूनही सर्व जखमी वर सोलापूर सिव्हील हाॅस्पिटल व उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

करमाळा : येथील ऑफ महाराष्ट्रचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी इमारतीचे मालक राजेश दोशी व संदेश दोशी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी (ता. 31) रात्री उशीरा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच मध्यरात्री संशयित आरोपी राजेश दोशी व संदेश दोशी या दोघांनाही पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी दिली आहे. 

बँकेच्या व्यवस्थापकांनी याबाबत करमाळा पोलिसात फिर्याद दिली आहे.
काल बुधवारी सकाळी अकरा वाजता बँक ऑफ महाराष्ट्राचे स्लॅब कोसळून दोन जणांचा मृत्यू, तर 21 जण जखमी झाले. अजूनही सर्व जखमी वर सोलापूर सिव्हील हाॅस्पिटल व उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

ज्या इमारतीत ही बँक चालत होती. त्या इमारतीच्या मालकांने इमारत बांधकाम पूर्ण झाल्यावर इमारतीच्या आतील भागात नगरपरिषदेची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता बदल केला. बँक भाड्याने देत असताना त्यांना बांधलेले स्लॅब कमकुवत असून भविष्यात हे स्लॅब कोसळून जीवित हानी होऊ शकते यांची कल्पना असूनही इमारत मालकाने कुठलीही दक्षता घेतली नाही. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील जाधव करत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2 arrested for slab collapsed in Karmala