रणगावमध्ये साठणार २ कोटी १६ लाख लिटर पाणी

राजकुमार थोरात
गुरुवार, 7 जून 2018

वालचंदनगर - रणगाव (ता.इंदापूर) येथील ओढा खोलीकरण व रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले असून ओढ्यामध्ये २ कोटी १६ लाख लिटर पाणी साचण्यास मोलाची मदत होणार आहे.

वालचंदनगर - रणगाव (ता.इंदापूर) येथील ओढा खोलीकरण व रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले असून ओढ्यामध्ये २ कोटी १६ लाख लिटर पाणी साचण्यास मोलाची मदत होणार आहे.

येथील गावालगतच्या ओढ्याचे सकाळ रिलीफ, भारतीय जैन संघटना व ग्रामपंचायत रणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ओढाखोलीकरण व रुंदीकरणाचे काम करण्यात आले होते. २६ हजार ४०० घनमीटर काम झाले असुन ओढ्यामध्ये २ कोटी ६४ लाख लीटर पाणी साठणार आहे. ओढा खोलीकरणाचा फायदा ओढयालगतच्या शेतकऱ्यांना होणार असून शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न, तसेच गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कमी होण्यास मोलाची मदत होणार आहे. या परीसरातील अनेक शेतकऱ्यांची जमीन क्षारपड असुन ओढा खोलीकरण झाल्यामुळे शेतजमीनीतील पाण्याचा निचरा होणार असुन जमीनीची सुपिकता वाढणार आहे.यासंदर्भात रणगावच्या सरपंच सुषमा राहुल रणमोडे यांनी सांगितले की, सकाळ माध्यम समुहाने  रिलीफ फंडातुन ओढ्यायाचे खोलीकरण केल्यामुळे पाणी टंचाईवरती मात करणे शक्य होणार असल्याचे सांगितले.

रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लागला..
ओढाखोलीकरणाचे काम सुरु असताना ओढ्याच्या पात्रातुन मुरुम निघत होता. ओढ्यालगत पुर्वीचा रस्ता होता.मात्र पावसाळ्यामध्ये या रस्त्यावरुन ये-जा करणे जिकरीचे होते. ओढ्याचे काम करीत असताना निघालेला मुरुम रस्त्यावर टाकून रस्त्याचे काम ही झाले असल्याने शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या प्रश्‍न ही कायमस्वरुपी मार्गी लागला आहे.

Web Title: 2 crore 16 lakh liters of water will be stored in Ranngaon