कवठेमहांकाळला दरवर्षी दोन कोटी तोटा

गोरख चव्हाण
गुरुवार, 14 जून 2018

कवठेमहांकाळ - कवठेमहांकाळ  बस स्थानकाला चालक-वाहकांची कमतरता व खासगी प्रवासी वाहतुकीमुळे वार्षिक सरासरी दोन कोटींपर्यंत आर्थिक तोटा होत आहे. चालक-वाहकांच्या कमतरतेमुळे बसफेऱ्या वेळेवर होत नाहीत. त्यामुळे प्रवासी नाईलाजाने खासगी वाहतुकीकडे वळलेत. त्याचा परिणाम आगाराच्या उत्पन्नावर झाला आहे.

कवठेमहांकाळ - कवठेमहांकाळ  बस स्थानकाला चालक-वाहकांची कमतरता व खासगी प्रवासी वाहतुकीमुळे वार्षिक सरासरी दोन कोटींपर्यंत आर्थिक तोटा होत आहे. चालक-वाहकांच्या कमतरतेमुळे बसफेऱ्या वेळेवर होत नाहीत. त्यामुळे प्रवासी नाईलाजाने खासगी वाहतुकीकडे वळलेत. त्याचा परिणाम आगाराच्या उत्पन्नावर झाला आहे.

कायम दुष्काळी तालुक्‍यात साठ गावे आहे. गाव तिथे एसटी असा ध्यास घेतलेल्या परिवहन महामंडळाने जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्य कणा असलेल्या चालक-वाहकांची कमी संख्या प्रवाशांना सेवा देण्यात अडसर ठरत आहे. त्याचा परिणाम उत्पन्नावर झाला आहे. 
सध्या आगारात ७० बसमधून दररोज १६० फेऱ्या होतात. त्याच आगारात कर्मचाऱ्यांसाठी दर दोन-तीन महिन्यांत आरोग्य तपासणी केली जाते.

प्रवाशांसाठी कूपनलिका, अन्य उद्‌भवातून पिण्यांच्या पाण्याची सोय केली जाते. तालुक्‍याच्या ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या सहा हजारांवर विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलत दिली जाते. ४० वर्षे वयावरील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत केली जाते. आगारातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खासगी मोटारसायकली अस्ताव्यस्तपद्धतीने उभ्या केल्या जातात. कार्यशाळेत सर्वच बसची देखभाल-दुरुस्ती केली जाते. चालक-वाहकांची संख्या कमी असल्याने ती पदे  तत्काळ भरण्याची गरज आहे.

हे करायला हवे...
 अंतर्गत रस्ते खराब, दुरुस्ती गरजेची
 मोटारसायकलींचे शिस्तबद्ध पार्किंग हवे
 आगार परिसर स्वच्छतेवर भर हवा
 विद्यार्थ्यांच्या मोठ्या संख्येमुळे पोलिस बंदोबस्त हवा

एकूण बस - ७० 
चालक - ११६ (गरज १५०) 
वाहक - ११६ (गरज १५०) 
कार्यशाळा व प्रशासन - ७७
दररोजच्या फेऱ्या - १६० 
लांब पल्ल्याच्या फेऱ्या - २३ 
दररोज सरासरी उत्पन्न - ६ लाख
मासिक सरासरी उत्पन्न ः २ कोटी

प्रवाशांनी बसमधून प्रवास करावा. अवैध प्रवासी वाहतुकीला ‘नाही’ म्हणावे. अवैध प्रवासी वाहतुकीचा फटका बससेवेलाच बसतो. सध्या आगारातून तेवीस लांब पल्ल्याच्या गाड्या जातात. चालक-वाहकांची संख्या कमी असल्याने आगाराला तोटा सहन करावा लागतोय.
- स्वप्नील पाटील, आगार व्यवस्थापक, कवठेमहांकाळ

Web Title: 2 crore rupees loss to kavthemahankal st depo