बार्शी: कंटेनर-ट्रॅव्हल्सच्या अपघातात दोन ठार, पंधरा जखमी 

सुदर्शन हांडे
सोमवार, 14 मे 2018

तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अतिवेगाने, परिस्थिती कडे दुर्लक्ष करूण, वाहन अविचाराने चुकीच्या दिशेला वळवुन अपघात करूण दोघांच्या मृत्यूस व दोन्ही वाहनांच्या नुकसानीस कारणीभुत ठरल्याप्रकरणी खाजगी बस चालकाविरूद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बार्शी : भरधाव वेगातील खाजगी ट्रॅव्हल्स व कंटेनर यांच्यात समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत ट्रॅवहल्स मधील लातुर जिल्ह्यातील दोन प्रवाशी ठार तर १५ प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची घटना बार्शी-लातूर रोड वरील कुसलंब गावा जवळ घडली. ही घटना शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली.

या अपघातात रमेश सुदाम गंभीरे (रा.वागदरी ता.रेणापुर जि.लातुर), शिवणुर्ती बिभिषण कांबळे (रा.गुंजरगा ता.निलंगा जि.लातुर) या दोघांचा मृत्यू झाला. अक्षता शिवानंद भालके (वय २२), योगिता बाबुराव जाधव (वय २२), नागनाथ गोरोबा सुरवसे (वय २५), लक्ष्मण बाळासाहेब करपे (वय ६२), गफुर उमर मसुदार (वय ६५), विठ्ठल नारायण सोळुंकी (वय ७५), निलकंठ विठ्ठल रातपुत (वय २५), योगेश राजेंद्र सराफ (वय २६), शालिनी तानाजी सुर्यवंशी (वय २१), सर्व रा.लातुर, आदित्य शाम पांचाळ (वय १०), शाम मुरलीधर पांचाळ (वय ५०), स्वरूपा शाम पांचाळ (वय ६०) सर्व रा. हासेगाव, अंकुश विजय उंबरे (वय ३६) रा.माळेगाव, व पार्वती महादेव मल्हारे (वय ४२) रा.लोहारा, गफुर उमरसाब मासुदार (वय ५०) रा.तेली गल्ली ता.जि.लातुर अशी अपघातातील जखमींची नावे आहेत. एम एच १२ एफ सी ८०२२ व एम एच २४ जे ९०९७ अशी या अपघातग्रस्त वाहनांचे क्रमांक  आहेत. किशोर अंगद शिंदे रा.खलाग्रो ता.रेणापुर जि.लातुर  असे अपघात करूण दोन प्रवाशांच्या मृत्युस व तिन लाख रूपयांचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात  आलेल्या खाजगी प्रवाशी बस चालकाचे नाव आहे.

जखमी गफुर उमरसाब मासुदार वय ५० रा.तेली गल्ली ता.जि.लातुर यांनी याबाबत बार्शी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि ते खुद्दबुद्दीन शेख रा.हडपसर यांच्या मालकीच्या कंटेनरवर चालक म्हणून काम करतात.ते त्यांच्या ताब्यातील कंटेनर क्रमांक एम एच 12

१२ एफसी ८०२२ मध्ये कुरकुंभ (पुणे) येथुन नागपूर येथे भाडे घेऊन जात होते. दरम्यान ते जामगाव ते कुसळंब दरम्यान असलेल्या एका खाजगी पंपाजवळ  आले असता समोरूण लातुर च्या दिशेने आलेल्या व  पुणे शहराच्या दिशेने भरधाव वेगाने जाणा-या एम एच २४ जे ९०९७ या खाजगी ट्रॅव्हलने अचानक समोर येऊन त्याने त्याच्या ताब्यातील खाजगी प्रवाशी बस त्याच्या उजव्या बाजुने व चुकीच्या दिशेने वळवली. त्या झालेल्या अपघातात खाजगी प्रवाशी बसमधील दोघेजन मृत्यू मुखी पडले. जखमींना रूग्नवाहिकेमधुन बार्शी येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले  आहे.
 
तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अतिवेगाने, परिस्थिती कडे दुर्लक्ष करूण, वाहन अविचाराने चुकीच्या दिशेला वळवुन अपघात करूण दोघांच्या मृत्यूस व दोन्ही वाहनांच्या नुकसानीस कारणीभुत ठरल्याप्रकरणी खाजगी बस चालकाविरूद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: 2 dead in accident near Barshi