बापरे...पोलिस आयुक्‍तांकडून 20 अधिकाऱ्यांच्या बदल्या

बापरे...पोलिस आयुक्‍तांकडून 20 अधिकाऱ्यांच्या बदल्या

सोलापूर : शहरातील गुन्हेगाराला आळा बसावा, शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित व्हावी या उद्देशाने नुतन पोलिस आयुक्‍त अंकूश शिंदे यांनी सातत्याने पोलिस दलात बदल केले आहेत. काही दिवसांपूर्वी परिमंडळ पथक बरखास्त केले तर काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदली पोलिस आयुक्‍तालयात केली होती. त्यानंतर त्यांनी आता तीन सहायक पोलिस आयुक्‍तांसह नऊ पोलिस निरीक्षक, सहा सहायक पोलिस निरीक्षक, दोन पोलिस उपनिरीक्षकांची शहरांतर्गत बदल्या केल्या आहेत. मात्र, पोलिस अस्थापनाच्या बैठकीतील निर्णयानुसार बदल्या केल्याचे स्पष्ट केले आहे.

कालकुपी : सोलापुरातील पहिले सार्वजनिक वाचनालय


पोलिस अस्थापनाच्या 28 नोव्हेंबरच्या बैठकीनुसार प्रशासकीय कारणास्तव बाहेरील घटकांकडून बदलून आलेल्या अधिकाऱ्यांच्या नियुक्‍तीसाठी या बदल्या करण्यात आल्याचे पोलिस आयुक्‍तालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बजरंग साळुंखे यांची बदली एआयडीसी पोलिस ठाण्यातून सदर बझारला करण्यात आली आहे. राजेंद्र बहिरट यांना सदरबझारऐवजी विशेष शाखेत तर कैलास काळे यांच्याकडे विजापूर नाका पोलिस ठाण्याऐवजी नियंत्रण कक्षात नियुक्‍ती दिली आहे. शिवाजी राऊत यांच्याकडे जेलरोडचा पदभार तर कमलाकर पाटील यांच्याकडे विजापूर नाका पोलिस ठाण्याचा पदभार दिला आहे. संतोष काणे यांच्याकडे शहर वाहतूक शाखेचा तर राजेंद्र करणकोट यांच्याकडे जोडभावी पोलिस ठाण्याचा पदभार सोपविला आहे. सुर्यकांत पाटील यांची विशेष शाखेतून एमआयडीसी पोलिस ठाण्यात नियुक्‍ती करण्यात आली असून हेमंत शेंडगे यांच्याकडील निवडणूक कक्षाची जबाबदारी काढून त्यांना सदरबझार पोलिस ठाण्याचा पदभार सोपविण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक वैभव माळी यांची जेलरोडवरुन सुरक्षा शाखेकडे तर संजय क्षिरसागर, अमित शेटे, जीवन निरगुडे, विजय पाटील, नितीन पेटकर यांची नियंत्रण शाखेतून अन्य ठिकाणी बदली करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक बालाजी मस्के, शशिकांत लोंढे यांची अनुक्रमे विजापूर नाका व जेलरोड पोलिस ठाण्यात बदली केली आहे. तसेच सहायक पोलिस आयुक्‍त रुपाली दरेकर, महावीर सकळे, डॉ. प्रिती टिपरे यांचीही बदली करण्यात आली आहे.

एकही कारखाना सुरु नाही, तरीही दररोज 8 हजार मेट्रिक टन उसाची तोडणी


कार्यभाराचा तत्काळ अहवाल सादर करा
पोलिस आस्थापनाच्या बैठकीनुसार ज्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांनी तत्काळ पदभार स्वीकारावा अशा सूचना पोलिस आयुक्‍त अंकूश शिंदे यांनी संबंधितांना दिले आहेत. दुसरीकडे त्यांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी कार्यभार दिली अथवा घेतला याचा अहवाल सादर करावा, असे निर्देशही दिले आहेत. पोलिस खात्याअंतर्गत या बदल्या झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांबद्दलच्या वाढत्या तक्रारींमुळे हा निर्णय घेतल्याचा सूरही निघू लागला आहे.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com