शाळा खोल्यांसाठी हवेत २० कोटी

ZP-Satara
ZP-Satara

सातारा - गुणवत्तेत सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांनी राज्यात नावलौकिक मिळविला आहे. मात्र, या शाळांना भौतिक सुविधांसाठी अद्यापही संघर्ष करावा लागत आहे. ५६ शाळांतील तब्बल १६५ शाळा खोल्यांची स्थिती धोकादायक बनली असून, त्या पाडण्याची नितांत गरज आहे. दुसरीकडे गुणवत्तेच्या जोरावर शाळांची पटसंख्या वाढली तरीही 
त्यांना जादा खोल्या मिळत नसल्याचे दुर्दैव समोर आले आहे. ते दूर करण्यासाठी तब्बल २० कोटी ५० लाखांची गरज आहे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत संकलित मूल्यमापन चाचणीत राज्यात ठसा उमटविला. तसेच ‘असर’ अहवालामध्ये प्राथमिक शिक्षणाची स्थिती चांगली असल्याचे समोर आले. झेडपीच्या प्राथमिक शाळांमध्ये खासगी माध्यमांच्या शाळांतील विद्यार्थी दाखल होत आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असलेल्या शाळांमध्ये पटसंख्या वाढत आहे. मात्र, भौतिक सुविधांसाठी निधी मिळत नसल्याने अशा अनेक शाळांना वर्गखोल्या पुरेशा मिळत नाहीत. माझेरी (ता. फलटण), विखळे (ता. खटाव) अशा अनेक गुणवत्तापूर्ण शाळांना वर्ग खोल्या नसल्याने ग्रामस्थांनी लोकसहभागातून या शाळांना खोल्या दिल्या आहेत. 

नैसर्गिक आपत्ती तसेच बांधकामाला खूप वर्षे झाल्याने ५६ शाळांतील १६५ खोल्यांची स्थिती धोकादायक बनली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या ‘स्ट्रक्‍चरल ऑडिट’मध्ये ही माहिती समोर आली. 

या खोल्या पाडण्यासाठी सर्वसाधारण सभेने परवानगी दिली आहे. या शाळांतील काही खोल्या तसेच नव्याने सुमारे २५० खोल्यांचे बांधकाम करावे लागणार असून, त्यासाठी १५ कोटींची आवश्‍यकता आहे. तसेच ३०० खोल्या दुरुस्तीसाठी पाच कोटी ५० लाखांची आवश्‍यकता आहे. 

त्याला जिल्हा नियोजन समितीमधून मंजुरी मिळावी, यासाठी प्रयत्न करत असल्याचे शिक्षण सभापती राजेश पवार यांनी सांगितले. 

...असा हवा निधी 
१५ कोटी - नवीन खोल्या बांधणे
५.५ कोटी - खोल्या दुरुस्ती करणे
१६५ - धोकादायक खोल्या 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com