मिरचीच्या दरात सांगलीमध्ये २० टक्के वाढ

मिरचीच्या दरात सांगलीमध्ये २० टक्के वाढ

सांगली - भर उन्हाळ्यात मिरचीच्या दरात  १५ ते २० टक्केंनी वाढ झाली आहे. ज्या दिवसात वर्षभराची चटणी करून ठेवायची त्या दिवसातच मिरचीची आवक थंडावली आहे आणि दर भडकला आहे. ज्वारीचेही दर तेजीत आहेत. मिरचीही महागल्याने गरिबांची चटणी-भाकर महागडी झाली आहे.

कर्नाटक, तमिळनाडूतून मिरची येते. मिरचीला उन्हाळ्यात भलताच दर येतो. कारण या दिवसातच गृहिणी वर्षभरासाठीची चटणी एकदम करत असतात. चटणी व्यावसायिकही याच दिवसात मिरची खरेदी करतात. पण यंदा कर्नाटक आणि इतर राज्यात मिरचीचं उत्पादनच  कमी झालं आणि परिणामी बाजारपेठेत आवकच पुरेशी झाली नाही. त्यामुळं मिरचीचे दर भडकले आहेत. मिरचीसह तिखटांसाठीच्या मसाला साहित्याचीही दरवाढ झाली आहे. गृहिणींचं वर्षाचं बजेट कोलमडलं आहे.

मिरचीचे दरवाढ ( किलोत)
देशी संकेश्वरी ९० वरून १२५,  लवंगी, तेजा १२० वरून १४०, बेडगी १४० वरून १८०, काश्‍मिरी २२० वरून २८० रुपये अशी वाढ झाली
आहे. 

आवक घटल्यानं सांगलीतील मिरच्यांची दरवाढ झाली आहे. मसाल्याच्या पदार्थांचे दरही वाढलेत. परिणाम खरेदीवरही झाल्याचं जाणवतं आहे. उन्हाळ्यात हा दर वाढतोच, पण यंदासारखा दराचा उच्चांक कधीच झाला नव्हता.
- प्रकाश माडग्याळ,
मिरची व्यापारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com