अबब... सोलापुरात कांद्याला मिळाला यंदाच्या वर्षातील उच्च्यांकी 'इतका' दार

अबब... सोलापुरात कांद्याला मिळाला यंदाच्या वर्षातील उच्च्यांकी 'इतका' दार

सोलापूर : यंदा पहिल्यांदाच कांद्याच्या दराने आज 20 हजारापर्यंतचा उच्चांक केला. गौडगाव (ता.अक्कलकोट) येथील शेतकरी शिवानंद फुलारी यांनी हा दर मिळविला. व्यापारी अतिक नदाफ यांच्याकडे कांद्याच्या सात गोण्या विक्रीसाठी आणल्या होत्या. त्यात पहिल्या प्रतीच्या कांद्याच्या त्यांच्या 6 गोण्या (309 किलो) होत्या. तर दुसऱ्या प्रतीची एक गोणी होती. त्यात पहिल्या प्रतीच्या कांद्याला प्रतिक्विंटलला प्रत्येकी 20 हजाराचा दर मिळाला. दुसऱ्या प्रतीच्या कांद्याला 2500 रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला. हा दर मिळाल्यानंतर आनंदित झालेल्या शेतकरी शिवानंद फुलारी यांनी बोली लावणारे व्यापारी नदाफ यांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. 

हेही पहा : सोलापूरच्या बाजार समितीमधील थेट कांद्याचा लिलाव (VIDEO)

सोलापूर बाजार समितीमधील अडत व्यापारी अजय पाटील यांच्याकडे कांदा आणलेल्या शेतकऱ्याला तब्बल 19 हजार रूपये दर मिळाला. त्याचा हा थेट लिलाव. (VIDEO)

पंधरा दिवसांपूर्वी प्रतिक्विंटलला आठ हजारांवर असणारा दर गुरुवारी (ता.5) जवळपास अडीच पटाने वाढून प्रतिक्विंटलला सर्वाधिक 20 हजार रुपयांवर पोचला. आज बाजारात कांद्याची आवक 200 हून अधिक गाड्यांपर्यंत कायम होती. सध्या कांद्याची आवक स्थानिक भागातून कमी असली, तरी बाहेरील जिल्ह्यातून मात्र अधिक आहे. नगर, पुणे, सातारा, उस्मानाबाद आणि लातूर, बीड भागातून हा कांदा सोलापूर बाजार समितीत येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com