सांगली जिल्ह्यातून यंदा होणार २० हजार टन द्राक्ष निर्यात

सांगली जिल्ह्यातून यंदा होणार २० हजार टन द्राक्ष निर्यात

सांगली - जिल्ह्यातून यंदा युरोपियन आणि आखाती देशांत २० हजार टन द्राक्ष निर्यात होणार आहे. दोन हजार १९१ शेतकऱ्यांनी ११४७ हेक्‍टर द्राक्षांची नोंदणी केली आहे. गेल्या पंधरवड्यापासून आखाती देशांत निर्यातीला सुरवात झाली आहे. ६०० टनांहून अधिक निर्यात झाली आहे. सध्या आखाती देशांत रंगीत द्राक्ष पेटीला ६००, तर पांढऱ्या द्राक्षाला ४०० रुपये दर मिळतोय. नाशिक जिल्ह्यातील द्राक्षांना थंडीचा फटका बसल्याने यंदा सांगलीची द्राक्षे भाव खाऊन जातील, असे चित्र आहे.

निर्यातीसाठी नोंदवलेल्या कंपन्यांकडून द्राक्ष खरेदी सुरू झाली. जानेवारी अखेरपासून निर्यात आणि देशांतर्गत बाजारात द्राक्ष मोठ्या प्रमाणावर दाखल होणार आहेत. सध्या थंडीमुळे फुगवण थांबल्याने पंधरवड्याने हंगाम लांबणार आहे. यंदा काळ्या शरद सीडलेस द्राक्षाला सर्वाधिक म्हणजे ६०० रुपये, तर पांढऱ्या द्राक्षाला ४०० रुपये दर मिळतो आहे. येणाऱ्या काळात हेच दर स्थिर राहण्याची शक्‍यता निर्यातदार शेतकरी व कंपन्यांकडून व्यक्त होत आहे.

युरोपात सर्वाधिक निर्यात नेदरलॅंड, नॉर्वे, युनायटेड किंगडम, बेल्जियम, लुधानिया येथे होते. गेल्यावर्षी ६६५ कंटेनर निर्यात झाली होती. आखाती देशातील दुबई, कुवेत,  सौदी अरेबिया, थायलंड, मलेशिया, दुबई येथे ७९० कंटेनर निर्यात झाली होती. रिसिड्यू फ्रीसह निर्यातीचे मापदंड पाळणाऱ्यांचीच द्राक्ष निर्यात होते. निर्यातीसाठी ॲपेडाकडे नोंदणी आणि त्या आधारेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून प्रमाणपत्र द्यावे लागते.

गेल्या वर्षीच्या तुलनेत जादा निर्यात होण्याची शक्‍यता आहे. स्थानिक बाजारपेठेतही रसायनमुक्त द्राक्ष विक्रीची तयारी ठेवावी.            

- राजेंद्र साबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

द्राक्ष निर्यात युरोिपयन देश
(सन २०१६-१७ व २०१७-१८ टन) लुथानिया (१०५ व ९४), नेदरलॅंड (५०६९ व ४३०१), नॉर्वे (५८६ व ५८८), जर्मन (७१ व ४८२), डेन्मार्क (१४ व १४९), फिनलॅंड (५४० व ५४२), इटली (४८ व ६५), आयलॅंड (८० व ५४), स्पेन (३० व १८८), ऑस्ट्रेलिया (१३ व शून्य), बेल्जियम- (१०१५ व ८०१), स्वित्झर्लंड (१४८ व ४८), फ्रान्स (६१ व १७२). युनायटेड किंगडम (१०२१ व ९८६), झिंच रिपब्लिक- (२६ व ३०).

दोन वर्षांतील द्राक्ष निर्यात 

                सन २०१७-१८    सन २०१८-१९
तालुका     नोंदणी क्षेत्र (हेक्‍टर)     शेतकरी     नोंदणी क्षेत्र (हेक्‍टर)     शेतकरी
आटपाडी    १६.९२    ३०    १७.६५    २८
जत    १०९.१०    १०४    ४८.७०    ६०
कडेगाव    ४.६५     ९    १९.७८    ४२
क.महांकाळ    १५.०५    ३६    ११.१२    २०
खानापूर    ३६२.३१    ७२०    ४३४.२९    ८६२
मिरज    ११५.९०    २२०    २१४.४८    ४०८
पलूस    ८४.४३    १६९    ५५.२७    १००
तासगाव    ३२२.१४    ६५०    ३३३.९०    ६४९
वाळवा    .........,    .....,    ११.६५    २२
एकूण    १३५२.६४    १९५८    ११४६.८४    २१९१
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com