निपाणीत 20 तोळे दागिने लंपास 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी तब्बल 20 तोळे दागिने लंपास केले. येथील शिवाजीनगर पहिल्या गल्लीत बुधवारी (ता. 27) सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यामध्ये सुनीलकुमार चंद्रकुमार चक्रवर्ती यांना सुमारे 6 लाखाचा फटका बसला. भर वस्तीत झालेल्या या धाडसी चोरीमुळे शहरासह उपनगरात भीती व्यक्त होत आहे. 

निपाणी -  बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी तब्बल 20 तोळे दागिने लंपास केले. येथील शिवाजीनगर पहिल्या गल्लीत बुधवारी (ता. 27) सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यामध्ये सुनीलकुमार चंद्रकुमार चक्रवर्ती यांना सुमारे 6 लाखाचा फटका बसला. भर वस्तीत झालेल्या या धाडसी चोरीमुळे शहरासह उपनगरात भीती व्यक्त होत आहे. 

पोलिसांसह घटनास्थळावरून याबाबत मिळालेली माहिती अशी, सुनीलकुमार चक्रवर्ती हे सध्या घरीच असायचे. त्यांना विवाहित मुलगी व नात असून त्यांच्यासोबत शिवाजीनगर पहिली गल्लीमध्ये ते राहतात. काही महिन्यांपूर्वी त्यांनी बिरदेवनगरात नवीन घर बांधले आहे. त्यामुळे ते दोन्ही ठिकाणी वास्तव्यास असतात. मंगळवारी (ता. 26) रात्री ते मुलगीसह बिरदेवनगरातील नवीन घरात वस्तीला आले होते. मध्यरात्री चोरट्यांनी बंद घराचे कुलुप तोडून ही धाडसी चोरी केली.

चोरट्यांनी घरात प्रवेश करून दोन्ही मजल्यावरील तिजोऱ्या व कपाटांचे कुलुप कटावणीने उचकटले. त्यातून सोन्याचे 10 तोळ्याचे गंठण, 3 तोळ्यांच्या एकुण पाच अंगठ्या, 4 तोळ्यांची कर्णफुले, 3 तोळ्यांच्या एकुण तीन चेन असे 6 लाख रूपये किंमतीचे 20 तोळ्याचे दागिने लंपास केले. मात्र घरात रोकड न ठेवल्याने ती चोरट्यांच्या हाती लागली नाही. घरातील तळ मजल्यावर ही चोरी करून चोरट्यांनी पहिल्या मजल्यावर देखील चाचपणी केली. पण तेथे काहीच हाती लागले नाही. चोरट्यांनी एवढ्यावरच न थांबता शेजारील बंद असलेल्या जयसिंग घोडके व फुंडिफल्ले यांच्या घरातही चोरीचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. 
बुधवारी सकाळी घटनेची माहिती मिळताच सहाय्यक फौजदार एम. जी. निलाखे, डी. बी. कोतवाल व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याबाबत सुनीलकुमार चक्रवर्ती यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. 

60 ते 70 फुटांवर सीसीटीव्ही 
चोरी झालेल्या घरापासून 60 ते 70 फुटांवर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला आहे. त्यामध्ये चोरटे कैद झाल्याची शक्‍यता असल्याने त्यादृष्टीने पोलिस तपास करणार आहेत. चोरट्यांचा माग निघाल्यास अनेक गुन्हे उघडकीस येणार आहेत.

Web Title: 200 gram gold theft in nippani