सहकारमंत्र्यांच्या जिल्ह्यातच 202 सहकारी संस्थाची घट 

तात्या लांडगे
शनिवार, 28 जुलै 2018

सोलापूर : मागील वर्षीच्या तुलनेत मार्च 2018 पर्यंत जिल्ह्यातील 202 सहकारी संस्था घटल्या असून त्यापैकी काही संस्था बंद करण्यात आल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले. 

सोलापूर : मागील वर्षीच्या तुलनेत मार्च 2018 पर्यंत जिल्ह्यातील 202 सहकारी संस्था घटल्या असून त्यापैकी काही संस्था बंद करण्यात आल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले. 

अटल महापणन अभियानाच्या माध्यमातून राज्य सरकार अडचणीतील अथवा डबघाईला आलेल्या सहकारी संस्था सक्षम करत आहे. मात्र, दुसरीकडे मागील वर्षाच्या तुलनेत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या जिल्ह्यातील यंदा तब्बल 202 सहकारी संस्था घटल्याचे उघड झाले आहे. त्यामध्ये भू-विकास बॅंक, सामान्य यंत्र उद्योग सहकारी संस्था, बलुतेदार संस्था, सूतधागा वापरणारी व विद्यार्थी सहकारी ग्राहक भांडार या प्रत्येकी एका सहकारी संस्थांचा तर नागरी भागातील सहा गृहनिर्माण संस्था, प्रत्येकी तीन शेतकरी व देखरेख सहकारी संस्था आणि नोकरदारांच्या पतपुरवठा संस्थांचा समावेश आहे. तसेच दोन तालुका खरेदी-विक्री संघही बंद झाले आहेत. 

जिल्ह्यात 14 सहकारी साखर कारखाने व एका जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसह 55 प्रकारच्या सहकारी संस्था कार्यरत आहेत. मार्च 2017 मध्ये जिल्ह्यात चार हजार 774 सहकारी संस्था कार्यरत होत्या, मार्च 2018 मध्ये त्यात 202 संस्थांची घट झाली आहे. त्यामध्ये कागदावरच्या अथवा पिशव्यातील संस्थांचाही समावेश आहे. परंतु, त्या संस्था सक्षम करण्याऐवजी कायमस्वरुपी बंद करण्यात आल्या आहेत. त्याबाबत जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. 

घटलेल्या सहकारी संस्था -
- प्राथमिक हातमाग कापूस संस्था : 102 
- पाणी वापर संस्था : 37 
- नागरी पतपुरवठा संस्था (ग्रामीण) : 25 
- प्राथमिक यंत्रमाग कापूस संस्था : 16

Web Title: 202 cooperative institute decrease in minister subhash deshmukh district