शिरोळचा दत्त कारखाना पुन्हा सत्ताधाऱ्यांकडेच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

शिरोळ - येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री दत्त शेतकरी विकास पॅनेलचे सर्व २१ उमेदवार सरासरी १५ हजारांच्या मताधिक्‍याने निवडून आले. मागील सर्व निवडणुकीचे विक्रम मोडीत काढीत गणपतराव पाटील यांनी ‘दत्त’वरील सत्ता कायम राखली आहे. निवडणुकीत विरोधी गटाचा धुव्वा उडाला. 

शिरोळ - येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री दत्त शेतकरी विकास पॅनेलचे सर्व २१ उमेदवार सरासरी १५ हजारांच्या मताधिक्‍याने निवडून आले. मागील सर्व निवडणुकीचे विक्रम मोडीत काढीत गणपतराव पाटील यांनी ‘दत्त’वरील सत्ता कायम राखली आहे. निवडणुकीत विरोधी गटाचा धुव्वा उडाला. 

कारखान्याच्या निवडणुकीत शनिवारी उत्स्फूर्त मतदान झाले. मतदानाची टक्‍केवारी वाढल्यामुळे, विरोधकांना परिवर्तनाची अशा होती, मात्र अनुसूचित जाती व जमातीच्या मतमोजणीतील निकालानंतर कारखान्याच्या सभासदांनी या निवडणुकीत गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवल्याचे स्पष्ट झाले. 

विरोधकांना ‘ब वर्ग’ बिगर उत्पादक गटातील दस्तगीर बाणदार यांच्या विजयाची आशा होती; मात्र तिही फोल ठरली. सुरवातीला ब वर्ग बिगर उत्पादक गटातील दोन जागांची मतमोजणी झाली. यामध्ये सत्ताधारी गटाचे रणजित कदम यांना ७२७ व इंद्रजित पाटील यांना ६०२ मते मिळाली. 

अनुसूचित जाती व जमाती गटातील दगडू कांबळे यांनी १७ हजार ७०७ मते मिळवून गोरखनाथ माने यांच्यावर विजय मिळविला. सत्ताधरी गटाच्या महिला गटातील संगीता पाटील कोथळरीकर व  यशोदा कोळी यांनीही मोठ्या फरकांनी विजय मिळविला.

महिला व अनुसूचितजाती जमाती गटातील निकाल एकतर्फी लागल्याचे समजताच गणपतराव पाटील यांच्या समर्थकांनी जल्लोष सुरू करीत फटाक्‍याची आतषबाजी केली. उत्पादक गटातील सर्वसाधरण १६ जागांचे निकाल दोन फेऱ्यात जाहीर केले. पहिल्या फेरीत सत्ताधारी गटाच्या उमेदवार ८ हजार मताच्या फरकाने आघाडीवर होते. मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीतही मताधिक्‍य वाढत गेले. सुमारे पंधरा हजार मतांच्या फरकांनी गणपतराव पाटील यांचे उमेदवार निवडून आले.

सत्तारूढ गटाचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी ः  गणपतराव पाटील (जांभळी, १७३२२), सिदगोंडा पाटील, (कागवाड, १७१०६), श्रीमती विनिया घोरपडे, (कुरुंदवाड, १७२९९), रघुनाथ पाटील, (चंदूर, १७१०८), अनिलकुमार यादव, (शिरोळ, १७१४३), अरुणकुमार देसाई, (सदलगा, १६८२४), अमर यादव, (मांजरी, १७२६५), बसगोंडा पाटील, (खिद्रापूर, १७१३३), शेखर पाटील, (धरणगुत्ती १७२२०), प्रमोद पाटील, (अर्जुनवाड, १७३४२), विश्‍वनाथ माने, (गणेशवाडी, १६९६८), शरदचंद्र पाठक , (कुन्नूर, १७३४२), श्रेणिक पाटील, (चाँदशिरदवाड, १७२०७), बाबासो पाटील, (अब्दुललाट, १७२४७), अंजूम मेस्त्री, (शिरोळ, १७१०१), निजामसो पाटील, (शेडशाळ, १७२५१) ,

अनुसूचित जाती व जमाती गट दगडू कांबळे, (टाकवडे, १७७०७)
उत्पादक महिला गट ः  संगीता पाटील, (कोथळीकर, १७९९४), यशोदा कोळी, (उदगाव १७६५७), 

ब वर्ग बिगर उत्पादक आणि संस्था गट ः रणजित कदम, (शिरदवाड, ७२७), इंद्रजित पाटील, (बेडक्‍याळ, ६०२)

स्व. सा. रे. पाटील यांनी दत्त कारखान्याचे वैभव उभा करताना ऊस उत्पादकांचे आणि कामगारांचे हित डोळ्यांसमोर ठेवून कामकाज केले.  विरोधकांनी निवडणूक लावल्यामुळे सभासदांशी संवाद साधून कारखान्याच्या प्रगतीचा आढावा मांडता आला. सभासदांनी आमच्यावर दाखवलेला विश्‍वास डोळ्यांसमोर ठेवून कारभार करू 
- गणपतराव पाटील 

१६ जुलै रोजी तहकूब केलेली सभा आज निकाल घोषित केल्यानंतर संपली आहे. ही निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सर्वानी सहकार्य केले.  चेअरमन व व्हा. चेअरमनच्या निवडीकरिता मंगळवारी (ता.३०) सभा बोलविली आहे.
- समीर शिंगटे,
निवडणूक निर्णय अधिकारी.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा