जिल्ह्यात दिवसभरात नवे 21 रुग्ण; 40 जण कोरोनामुक्त 

घनशाम नवाथे 
Saturday, 19 December 2020

जिल्ह्यात आज झालेल्या आरटीपीसआर आणि ऍन्टीजेन चाचणीत 21 कोरोना बाधित रुग्ण आढळले. जत, मिरज, शिराळा आणि तासगाव तालुक्‍यात एकही रुग्ण आढळला नाही.

सांगली : जिल्ह्यात आज झालेल्या आरटीपीसआर आणि ऍन्टीजेन चाचणीत 21 कोरोना बाधित रुग्ण आढळले. जत, मिरज, शिराळा आणि तासगाव तालुक्‍यात एकही रुग्ण आढळला नाही. दिवसभरात जिल्ह्यात एकही मृत्यू झाला नाही. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील दोन रुग्णांचा येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर दिवसभरात 40 जण कोरोनामुक्त झाले. 

कोरोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यात प्रशासनासह आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. गेल्या काही दिवसांपासून 50 पेक्षा कमी कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. आज देखील दिवसभरात आरटीपीसीआर चाचणीत 300 रुग्ण तपासल्यानंतर 9 जण बाधित आढळले. तर ऍन्टीजेन चाचणीत 1139 रुग्ण तपासल्यानंतर 17 रुग्ण बाधित आढळले. दोन्ही चाचण्यात 26 रुग्ण आढळले. 

त्यापैकी 21 रुग्ण जिल्ह्यातील आणि पाच रुग्ण परजिल्ह्यातील आहेत. 21 पैकी सात रुग्ण महापालिका क्षेत्रातील आहेत. त्यामध्ये सांगलीतील पाच आणि मिरजेतील दोन आहेत. तसेच आटपाडी तालुका 6, कडेगाव 1, कवठेमहांकाळ 2, खानापूर 3, पलूस 1, वाळवा 1 याप्रमाणे रुग्ण आढळले. 
जिल्ह्यात आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील दोन रुग्णांचा येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज जिल्ह्यात 40 जण कोरोनामुक्त झाले. सध्या 281 जण उपचार घेत आहेत. त्यापैकी 35 जणांची प्रकृती चिंताजनक आहेत. 35 पैकी 28 जण ऑक्‍सिजनवर आणि 7 जण व्हेंटिलेटरवर आहेत. 

जिल्ह्यातील चित्र 
आजअखेर जिल्ह्यातील बाधित- 47362 
आजअखेर कोरोनामुक्त रुग्ण- 45356 
सध्या उपचार घेणारे रुग्ण- 281 
आजअखेर जिल्ह्यातील मृत- 1725 
परजिल्ह्यातील मृत रुग्ण- 217 
बाधितपैकी चिंताजनक रुग्ण- 35 
आजअखेर ग्रामीण रुग्ण- 23929 
आजअखेर शहरी रुग्ण- 7019 
महापालिका क्षेत्र- 16414 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 21 new patients a day in the district; 40 corona free