सांगली शहरात  22 कंटेन्मेंट झोन 

SGI20A13469_pr.jpg
SGI20A13469_pr.jpg

सांगली : शहरात आठवड्यात कोरोनाचे 24 रुग्ण वाढले. आठ दिवसांत रुग्णांची संख्या दुप्पट झाली. शहराच्या विविध भागात रुग्ण सापडल्याने चिंतेत भर पडली. महापालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या आजवर फारशी वेगाने वाढत नव्हती. पण, आठवड्याभरात 22 ठिकाणी कंटेन्मेंट झोन करण्यात आलेत. ही संख्या वाढण्याचीच शक्‍यता आहे. प्रशासनावर ताण वाढत आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेले तीन महिने महापालिका क्षेत्रात संसर्ग रोखण्यात प्रशासनाला चांगलेच यश आले. 16 मे रोजी वसंतदादा कारखाना परिसरात एक रुग्ण आढळला. त्यानंतर शहरात थेट महिन्याने शहरात रुग्ण आढळला. मात्र आठ दिवसांत शहरात 24 रुग्ण आढळलेत. बहुतांश लोक मुंबई, पुणे तसेच परराज्यातून आलेले आहेत. 

शहरात आठ दिवसांत खणभागातील शिकलगार गल्ली, गावभागातील शिकलगार गल्ली, स्वरुप टॉकीजजवळची गांधी वसाहत, शंभर फुटी रोडवरील एका हॉस्पिटलचे डॉक्‍टर आणि नंतर तेथील नर्स, प्रभाग अठरामधील हनुमान नगर, विठ्‌ठल नगर, कलानगर, वारणाली,

खणभागातील आझाद गल्ली, शामरावनगर, गणपती पेठेतील गुजर बोळ, कर्नाळ रोडचे दत्तनगर, कोल्हापूर रोड अशा विविध भागात रुग्ण सापडल्याने नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे. प्रशासनासमोर प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान आहे. मिरजेतही ब्राह्मणपुरी, इस्त्राइलनगर भागात रुग्ण सापडल्याने तेथेही संसर्ग पसरण्याची भिती आहे. 

आठवड्यात दुप्पट रुग्ण 
महापालिका क्षेत्रात आठ दिवसात 24 रुग्ण वाढल्याने आजवर रुग्णांची संख्या 43 झाली आहे. गेल्या रविवारी रुग्णांचा आकडा 20 होता. आठवड्यात मंगळवारी आणि गुरुवारी वगळता इतर सर्व दिवशी रुग्ण सापडलेत. त्यातही तीन दिवसांत 19 रुग्ण वाढलेत. ही बाब चिंताजनक आहे. 

चौकट 

कंटेन्मेंट झोनचा आकार कमी 
विजयनगर येथे पहिला रुग्ण सापडल्यानंतर प्रशासनाने एक किलोमीटरचा कंटेन्मेंट झोन आणि चार किलोमीटरचा बफर झोन केला. तब्बल 28 दिवस नागरिकांची अडचण झाली. कंटेन्मेंट झोनमध्ये कुटुंबे मोठ्या संख्येने अडकून पडली. त्यांना अत्यावश्‍यक सेवा पुरवण्याचे आव्हान प्रशासनासमोर होते. यातून धडा घेत कंटेन्मेंट झोनचा आकार आता शंभर ते दोनशे मीटर एवढाच केला आहे. त्यामुळेच सध्या शहरात 22 कंटेन्मेंट झोन असतानाही प्रशासनाला खबरदारीच्या उपाय योजना राबवण्यात अडचणी येत नाहीत. मात्र हा प्रादुर्भाव रोखला नाही तर प्रशासनासमोर अडचणी वाढू शकतात. 

कोट 

""शहरात समुह संसर्ग सुरू नाही. महापालिकेने मुंबई, पुण्याच्या प्रवाशी तसेच परदेशी प्रवाशांचे स्वॅब तपासले. अहवाल पॉझिटीव्ह आलेलेच त्यातील रुग्ण आहेत. डॉक्‍टरांनीही रुग्ण तपासताना काळजी घ्यावी. संशयास्पद रुग्ण आढळल्यास त्वरीत महापालिका किंवा शासकीय रुग्णालयास कळवावे.'' 

-नितीन कापडणीस, आयुक्त 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com