पेठ-सांगली महामार्गासाठी 22 कोटी मंजूर; नितीन गडकरी यांची ट्‌विटद्वारे माहिती

22 crore sanctioned for Peth-Sangli highway; Information of Nitin Gadkari through tweet
22 crore sanctioned for Peth-Sangli highway; Information of Nitin Gadkari through tweet

सांगली : पेठ-सांगली या 166 एच राष्ट्रीय महामार्गासाठी 22.62 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी आज ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. यामुळे पेठ-सांगली-मिरज या राष्ट्रीय महामार्गाच्या कामास गती येणार आहे. या निधीतून पेठ-सांगली महामार्गावरील 20 किमीचे काम पूर्ण करण्यात येईल. 


खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, भाजपचे पश्‍चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे यांनी यासाठी प्रयत्न केले. सांगलीला राष्ट्रीय महामार्गाशी जोडण्यासाठी जिल्ह्यात काही महामार्गांची कामे सुरू आहेत. तसेच पेठ सांगली हा 166 एच राष्ट्रीय महामार्गही केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केला आहे. या 46 किलोमीटरच्या मार्गाचे डांबरीकरणाचे काम होणार आहे.

यातील काही रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे, तर 18 कि.मी.चे काम मंजूर आहे. उर्वरित रस्त्याच्या डांबरीकरणासाठी प्रस्ताव दिला होता. त्या प्रस्तावाला मान्यता देत 22.62 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी मंजूर केला. त्यांनीच ट्‌विटरद्वारे ही माहिती दिली आहे. या निधीतून पेठ-सांगली राष्ट्रीय महामार्गाचे काम गतीने होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 


आमदार सुधीर गाडगीळ यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सांगलीला जोडणाऱ्या महामार्गांची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी केली होती. तसेच खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे, मकरंद देशपांडे यांनीही जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांसाठी पाठपुरावा केला आहे. 

संपादन : युवराज यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com