esakal | जिल्ह्यात कोरोनाचे 22 रुग्ण; 38 चिंताजनक, 28 ऑक्‍सिजनवर 

बोलून बातमी शोधा

22 patients of corona in the district; 38 worrying, 28 on oxygen}

जिल्ह्यात आज कोरोनाचे नवे 22 रुग्ण तर 21 जण कोरोनामुक्त झाले. पलूस आणि खानापूर तालुक्‍यातील प्रत्येकी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आर. टी. पी, सी. आरच्या 268 चाचण्यामध्ये 18 पॉझिटिव्ह तर ऍन्टिजेनच्या 874 चाचण्यांत आठ जण पॉझिटिव्ह सापडले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचे 22 रुग्ण; 38 चिंताजनक, 28 ऑक्‍सिजनवर 
sakal_logo
By
विष्णू मोहिते

सांगली : जिल्ह्यात आज कोरोनाचे नवे 22 रुग्ण तर 21 जण कोरोनामुक्त झाले. पलूस आणि खानापूर तालुक्‍यातील प्रत्येकी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आर. टी. पी, सी. आरच्या 268 चाचण्यामध्ये 18 पॉझिटिव्ह तर ऍन्टिजेनच्या 874 चाचण्यांत आठ जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. जिल्ह्यात आजही 38 रुग्णांची तब्बेत चिंताजनक आहे. त्यातील 28 जण ऑक्‍सिजनवर आहेत. 

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण जत तालुक्‍यात आहेत. आटपाडी व तासगाव तालुका प्रत्येकी दोन, कडेगाव, खानापूर, पलूस, महापालिका व मिरज तालुक्‍यात प्रत्येकी एक, वाळवा तालुक्‍यात सहा आणि जत तालुक्‍यात सात कोरोना रुग्ण सापडले. जिल्ह्यात उपचाराखालील रुग्णांची संख्या 166 आहे. 46 हजार 588 रुग्ण आजअखेर बरे झालेले आहेत.

1 हजार 760 रुग्ण मृत झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 48 हजार 514 रुग्ण सापडले होते. यामध्ये ग्रामीणमधील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 24 हजार 539, शहरी भागातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 7 हजार 248 आणि सांगली, मिरज व कुपवाड महापालिका हद्दीतील 16 हजार 727 रुग्णांचा समावेश आहे. 

कोरोना आज अखेर तालुकानिहाय 
आटपाडी-2509 
जत-2346 
कडेगाव-2966 
कवठेमहांकाळ- 2492 
खानापूर- 3013 
मिरज- 4555 
पलूस-2633 
शिराळा- 2300 
तासगाव- 2451 
वाळवा-5522 
महापालका- 16727 


संपादन : प्रफुल्ल सुतार