नगरमध्ये धुडगूस घातल्याप्रकरणी 22 जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

आमदार संग्राम जगताप यांना केडगाव येथील दुहेरी खून प्रकरणी कॅम्प पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक जयश्री नामदेव काळे यांनी फिर्याद दिली आहे.

नगर - काल रात्री आमदार संग्राम जगताप यांना केडगाव येथील दुहेरी खून प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी रात्री उशीरा पोलिस अधीक्षक कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी 22 लोकांना अटक केली आहे.

या प्रकरणी कॅम्प पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक जयश्री नामदेव काळे यांनी फिर्याद दिली आहे. सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण, नुकसान केल्याप्करणी कैलास रामभाऊ गिरवले,शरीफ राजू शेख, राहुल अरूण चिंतामणी, प्रसन्न मनोहर जोशी, सय्यद अर्शिद अकबर, आवेश जब्बार शेख, सय्यद जाएद असिफ, सागर मच्छिंद्र वाव्हळ, संजय मधुकर वाल्हेकर, अनिलरमेश राऊत, अनिकेत बाळासाहेब चव्हाण, अनिकेत बाळासाहेब चव्हाण, गिरीष सुभाषराव गायकवाड, दिपक रामचंद्र घोडेकर, रियाज रमजान तांबोळी, दत्ता सखाराम उगले, कुणाल सुभाष घोलप, साईनाथ यादव लोखंडे, सचिन रामदास गवळीस सोमनाथ भाऊसाहेब गाडळकर, संतोष लहानु सूर्यवंशी, धर्मा त्रिंबक करांडे, इर्मान जानसाब शेख यांना आज सकाळी 8:30 वाजता अटक करण्यात आली. 

फरार आरोपींमध्ये शिवाजी कर्डिले, दादाभाऊ कळमकर, सचिन अरूण जगताप, अभिजित कळमकर, बाबासाहेब गाडळकर, अभिजित खोसे, कुमार वाकळे, निखील वारे, दादा दरेकर, गजानन भाउवलकर, मुसा सादिक शेख, सागर ठोंबरे, घनशाम बोडखे, सागर पंधाडे, मतीन सय्यद, सुरेश बनसोडे, सागर डोंगरे, अफजल असीर शेख, कुलदिप भिंगारदिवे, बबलू सूर्यवंशी, विशाल सूर्यवंशी, सुनील त्रिंबके, दत्ता तापकिरे, अंकुश चत्तर, वैभव वाघ, सादिक अब्दूल रोफ सय्यद उर्फ खोका यांचा समावेश आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: 22 people arrested in nagar in murder case