पुरामुळे प्रसूतीसाठी २३ किलोमीटरचा पायी प्रवास

पुरामुळे प्रसूतीसाठी २३ किलोमीटरचा पायी प्रवास

कोल्हापूर - कोलिक (ता पन्हाळा) येथे माहेरी आलेल्या आश्विनी नीलेश निकम यांना प्रसववेदना सुरू झाल्याने ग्रामस्थांनी २३ किलोमीटर पायपीट करुन प्रथम बाजारभोगावात, तर नंतर सीपीआरमध्ये दाखल केले.

प्राप्त माहितीनुसार माहेरी आलेल्या अश्विनी नीलेश निकम (वय २२, रा. कंदलगाव,  ता. करवीर ) यांच्या प्रसूतीसाठी अवधी होता, मात्र प्रसववेदना सुरू झाल्याने आज सकाळी दहा वाजता कोलिकहून ठिकठिकाणी आलेल्या पुराच्या पाण्यातून मानवाड, पोंबरे, कांडरवाडी, काळजवडे, किसरूळ असा खाटल्यातून  जिवघेणा पायी प्रवास करत त्यांना बाजारभोगावात आणण्यात आले. 

दरम्यान, बाजारभोगावचे सरपंच नितीन पाटील यांच्या प्रयत्नामुळे अनंत अडचणींचा सामना  करुन केवळ  या रुग्णासाठी पीएचसीचे आरोग्य पथक  काऊरवाडी येथे पोहोचले. डाॅ. सरोळे यांनी तेथे अश्विनीवर  प्राथमिक उपचार करुन रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये नेले.

हे ठरले देवदूत ! 
कोलिकचे उपसरपंच शिवाजी कांबळे. बळवंत कांबळे,  दत्तात्रय कांबळे, प्रकाश कांबळे,अरुण कांबळे यांच्यासह ग्रामस्थांनी गर्भवतीस  प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचवले. त्यामुळे अश्विनीसाठी ते देवदूत ठरले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com