
जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाचे 23 नवे रुग्ण आढळून आले. महापालिका क्षेत्रात आज दिवसभरात 8 जणांना बाधा झाली. 13 जण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 47 हजार 711 झाली.
सांगली : जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाचे 23 नवे रुग्ण आढळून आले. महापालिका क्षेत्रात आज दिवसभरात 8 जणांना बाधा झाली. 13 जण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 47 हजार 711 झाली.
आज 324 जणांची आरटीपीसीआर तपासणी झाली. त्यात 12 बाधित आढळले. 853 जणांची अँटिजेन तपासणी करण्यात आली. त्यात 12 जण बाधित आढळले. आटपाडी तालुक्यात 4, जत तालुक्यात 6, खानापूरमध्ये 4, तर वाळवा तालुक्यात एकाला बाधा झाली. तसेच सांगली शहरातील आठ जणांना बाधा झाली.
सध्याची स्थिती अशी ः आजचे बाधित ः 23. उपचाराखाली ः 212. बरे झालेले ः 45 हजार 764. मृत्यू ः 1735. बाधित ः 47 हजार 711. चिंताजनक 40. ग्रामीण बाधित ः 24 हजार 146. शहरी बाधित ः 7 हजार 82. मनपा क्षेत्रात बाधित 16 हजार 483. जिल्ह्यात आज 23 रुग्ण नव्याने कोरोनाबाधित झाले. त्यामुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या 47 हजार 711 झाली आहे.
तालुकानिहाय कोरोनाबाधित रुग्ण
आटपाडी : 2460.
जत : 2207.
कडेगाव : 2917.
कवठेमहांकाळ : 2457.
खानापूर : 2916.
मिरज : 4526.
पलूस : 2623.
शिराळा : 2287.
तासगाव : 3374.
वाळवा : 5461.
महापालिका : 16,483.
संपादन : प्रफुल्ल सुतार