डोंगराला लागलेल्या वणव्यात 25 एकरातील झाडे झुडपे करपली

शिवाजीराव चौगुले
गुरुवार, 19 एप्रिल 2018

शिराळा (कोल्हापूर): बिऊर (ता. शिराळा) येथील पावलेवाडी खिंडी जवळ डोंगराला लागलेल्या वणव्यात खासगी मालकीचे २० तर वनविभागाचे पाच एकर असे २५ एकरातील झाडे झुडपे करपली असून गवत व गवताच्या गंज्या जाळून खाक झाल्या.

शिराळा (कोल्हापूर): बिऊर (ता. शिराळा) येथील पावलेवाडी खिंडी जवळ डोंगराला लागलेल्या वणव्यात खासगी मालकीचे २० तर वनविभागाचे पाच एकर असे २५ एकरातील झाडे झुडपे करपली असून गवत व गवताच्या गंज्या जाळून खाक झाल्या.

आज (गुरुवार) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. या बाबत अधिक माहिती अशी, पावलेवाडी खिंडीत शिराळा कोकरुड या मुख्य रस्त्या लागतच वन विभागाचा डोंगर असून त्यास लागून बिऊर येथील मालकी हक्काचा डोंगर आहे. त्या ठिकाणी वन विभागाची झाडे आहेत. सुमारे सव्वा बारा  वाजण्याच्या  सुमारास सुमारास पत्रकार शिवाजीराव चौगुले कोकरुड कडून शिराळ्याकडे जात होते. त्यावेळी नुकतीच जंगल व गावतास आग लागल्याचे दिसले,परंतु कडक उन्ह व वारा यामुळे एकट्याला आग आटोक्यात आणणे शक्य नव्हते. त्यांनी आगीची माहिती शिराळा वन विभागास दिली. त्यावेळी वन विभागाचे कर्मचारी बाबा गायकवाड, संजय देसाई, वसंत देसाई, अक्षय ढोकळे, रामचंद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.

कडक उन्हाळा, वाळलेले गवत व वारा यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते. निलगिरीच्या झाडाच्या फांद्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा दोन तास पर्यंत सुरु होता. सव्वा दोन तासात आग आटोक्यात आणण्यास यश आले.मात्र तो पर्यंत बिऊर येथील काही शेतकऱ्यांचे काढून ठेवलेल्या गवताच्या गंज्या जाळून खाक झाल्या. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. परंतु हि आग शॉर्ट सर्किटने लागली असल्याची शक्यता आहे. कारण या परिसरात या पूर्वीही शॉर्ट सर्किटने आग लावून डोंगर पेटल्याच्या घटना अनेकवेळा घडल्या आहेत.

मोठा अनर्थ टळला.
आगीची माहिती प्रसंगावधान राखून पत्रकार शिवाजीराव चौगुले यानी वन विभागाला दिली.वन विभागाचे कर्मचारी वेळेत आल्याने आग आटोक्यात आणणे शक्य झाले.आग वेळीच आटोक्यात आली नसती तर पावलेवाडी,उपवळे,तडवळे या डोंगराला आग लागून हजारो एकर डोंगर पेटला असता.हि आग आटोक्यात आणणे शक्य झाले नसते.

आगीच्या झळीने घामाचे लोट अन तहानेने व्याकुळ
भर उन्हामुळे आगीने रौद्र रूप धारण केले होते.खालून जमीन तापलेले,वरून उन्हं आणि समोरून आगीच्या झळा अंगावर झेलत पत्रकार शिवाजीराव चौगुले,बाबा गायकवाड,संजय देसाई,वसंत देसाई,अक्षय ढोकळे,रामचंद्र पाटील यांनी आग आटोक्यात आणली. त्यावेळी आगीच्या झळा बरोबर सर्वांच्या अंगातून घामाचे लोट वाहून सर्वजण तहानेने व्याकुळ झाले होते.

Web Title: The 25 acres of trees are covered with forests in the forest