Vidhan Sabha 2019 मतदानाच्या कामाला 25 हजार कर्मचारी

Polling Duty Officers
Polling Duty Officers

सातारा : विधानसभा निवडणुकीबरोबर सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे मतदान सोमवारी (ता. 21) होणार असल्याने प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी तब्बल 25 हजार कर्मचारी मतदान केंद्रांची व्यवस्था पाहणार आहेत. प्रशासनाने मतदारसंघ बदलून कर्मचाऱ्यांच्या नियुक्‍त्या दिल्या असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. 

मतदानासाठी केवळ पाच दिवस उरल्याने प्रशासकीय पातळीवर धावपळ सुरू आहे. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान होत असून, त्यात सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीची भर पडली आहे. त्यामुळे प्रशासनावर आणखीच ताण आला आहे. ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मतदानादिवशी 21 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती केली आहे. मतमोजणी दिवशी सुमारे पाच हजार कर्मचाऱ्यांचे नेमणूक केली जाणार आहे. एकंदरीत निवडणुकीची सर्व प्रक्रिया व्यवस्थित होण्यासाठी सुमारे 25 हजार कर्मचारी कार्यरत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली. मतदान प्रक्रिया योग्यरीत्या राबविली जावी, यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे मंगळवारपासून सुरू झाले आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर किमान पाच अधिकारी, कर्मचारी असणार आहेत. ईव्हीएम मशिन, व्हीव्हीपॅट योग्यरीत्या हातळले जावे, यासाठी हे प्रशिक्षण सुरू आहे.
 
दरम्यान, निवडणूक आयोग व प्रशासनाने मतदान प्रक्रिया पारदर्शक पार पडावी, यासाठी कर्मचाऱ्यांच्या नेमणुका त्यांच्या कार्यालयातील मतदारसंघाऐवजी इतर मतदारसंघांत केल्या आहेत. काही मतदारसंघातील अंतर खूपच जास्त असल्याने प्रशिक्षणाला जाणे, मतपेटी घेण्यासाठी जाणे, तेथून मतदान केंद्रावर जाणे पुन्हा मतपेटी जमा करणे या प्रक्रियेने चांगलीच दमछाक होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com