अडीच हजार एसटी गाड्यातून उत्सव प्रवास सुखकर 

अडीच हजार एसटी गाड्यातून उत्सव प्रवास सुखकर 

कोल्हापूर - कोकणातील गणेशउत्सवाचा थाटमाट उत्सव परंपरेचा मानबिंदू मानला जातो. नोकरी व्यवसाया निमित्त जगाच्या पाठीवर कुठेही असलेला कोकणवासिय उत्सवासाठी कोकणतल्या घरी जावून येतो. अशा लाखो प्रवाशांचा मुंबई - कोकण मार्गावरील प्रवास तब्बल अडीच हजार एसटी बसमधून सुखरूप झाला आहे.

अंदाजे साडेतीन लाख प्रवाशांच्या वाहतुकीत एकही गाडी ब्रेक डाऊन नाही की, कोणताही गंभीर किंवा किरकोळ अपघात न होता, एसटीचा प्रवास सुरक्षीत व सुखकर असल्याची साक्ष दिली आहे. या साऱ्यांचे नियोजन कोल्हापूरचे मुंबईतील एसटी वाहतुक अधिकारी राहूल तोरो व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. 

कोकणात जाण्यासाठी रेल्वेपासून खासगी गाड्याच्या अाधुनिक सुविधा आहेत. तरीही एसटीवरील पूर्वापार विश्‍वास, किफायतशीर भाडे, आवडेल तेथे प्रवासी पास, सुरक्षीत प्रवास, सर्वात महत्वाचे विमा संरक्षण असल्याने बहुतांशी कोकणवासीय एसटी प्रवासास प्राधान्य देतात. 

राज्यातील यात्रा, जत्रा, सण, उत्सवासाठी एसटी प्रवासांचे गेली १२ वर्षे राहूल तोरो नियोजन करतात. बारा वर्षाचा अनुभवपणाला लावून तोरो यांनी यंदा पंढरपूरची यात्रा यशस्वी केली. त्यापाठोपाठ गणेशउत्सव प्रवासाचे राज्यातील नियोजन केले. यंत्रशाळा गाड्या तंदूरस्त करून घेतल्या. निष्णात चालकांच्या ड्यूट्यांचे नियोजन केले. प्रवास मार्गावरील अडथळ्यांचा अंदाज घेतला यात मुंबईत - रत्नागिरी मार्गावर कांही अंतरात खड्डे, वाहतुक कोंडी, धोकादायक वळणे, घाट रस्ते पूल आणि जोरदार पाऊस अशा समस्यातून बसगाड्या सुरक्षित व वेळेत पोहचविण्यासाठी गाड्या वेळेचे काटेकोर नियोजन केले. 

एसटी बस उत्सवकाळात मुंबई - अलिबाग - रत्नागिरी ते सावंतवाडी तर दुसरा मार्ग मुंबई कोल्हापूर मार्गे पणजी या दोन्ही मार्गावर मिळून अडीच हजार गाड्या येता जाता धावल्या. 
वास्तवीक मुंबईतील वाहतुक गर्दीतून बाहेर पडण्यासाठी दोन तास जातात इथे वाहतुक वेळेच्या काटेकोर नियोजन असल्याने एसटीच्या चालकांनी एक दिड तासात अंतर पार करीत महामार्गावरून रत्नागिरी मार्गे सावंतवाडी वाटेवर एसटी मागस्त केली. गाडीला कांही तांत्रीक बिघाड होऊ नये म्हणून प्रत्येक आगारात तांत्रीक कर्मचाऱ्यांनी गाड्याच्या चाके, इंधन, ब्रेक तपासले, तंदुरूस्त असल्याचा सिग्नल देताच पुढील प्रवास अधिक सुखकर झाला. 

सकाळी सातला गाडीत बसलेला मुंबईकर दुपारी तीन वाजता सावंतवाडीच्या स्थानकात उतरला, लाल मातींचा धुरळा उडवत ओझे सावरत कोकणी पायवाटा चालत आळीत सुखरूप पोहचला. "एष्ठीने हाकाय लवकर इलो' म्हणत एसटी प्रवासांचा सुखद अनुभव व्यक्‍त केला. 

परिवहन मंत्री दिवाकर रावते, व्यवस्थापकीय संचालक, एसटीचे महाव्यवस्थापक यांचा प्रत्येक प्रवाशाला सुरक्षीत प्रवास मिळावा यासाठी आग्रह असतो. त्या नुसार यात्रा जत्रांचे नियोजन त्यांच्या मार्गदर्शनाखाली होते, त्यासाठी आमच्या वाहतुक विभागातील सहकारी सर्व आगार प्रमुख यांच्या योगदानातून व्यापक नियोजन घडले, सर्वात महत्वाचा भाग म्हणजे एसटीचे सर्व चालक वाहक या सगळ्यांच्या सामुदायिक योगदानातून हे आवाहन यशस्वी करता आले.

- राहूल तोरो  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com