सांगली जिल्ह्यात मध्यम, लघू प्रकल्पांत 26 टक्के पाणीसाठा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

सांगली : जिल्ह्यातील पाच मध्यम व 79 लघू प्रकल्पांत 26 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीपेक्षा 15 टक्‍क्‍यांनी हा पाणीसाठा अधिक आहे. गतवर्षीपेक्षा यंदा काहीशी समाधानकारक स्थिती आहे. टेंभू योजना सुरळीत सुरू आहे. शिवाय म्हैसाळ योजनेतून गावोगावचे तलाव भरून घेण्याचे आदेश दिल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाईची दाहकता कमी असणार आहे. 

जत तालुक्‍यातील प्रकल्पांमध्ये 35 टक्के म्हणजे 1081.06 दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू असून, या योजनांचे पाणी तलावात सोडले जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. 

जिल्ह्यातील पाच मध्यम प्रकल्पांत 14.80 तर 79 लघू प्रकल्पांत 42.55 दशलक्ष घन मीटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे. नऊ तालुक्‍यांतील 31 तलावांत 25 टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. यामुळे या तालुक्‍यांना भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसते आहे. तासगाव तालुक्‍यातील 2, खानापूर तालुक्‍यातील 1 आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यातील 1 असे चार तलाव कोरडे आहेत. तासगाव तालुक्‍यातील तलावात केवळ 2 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे या तालुक्‍यात पाणीटंचाई भासू लागली आहे. 

जत तालुक्‍याला कायम पाणीटंचाईला सामोरे जावे लागते आहे. मात्र यंदाच्या उन्हाळ्यात तालुक्‍यात पाणी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांसाठी पाणी उपलब्ध असेल. तालुक्‍यातील प्रकल्पांत 35 टक्के म्हणजे 1081.06 दशलक्ष घन फूट पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र जत पूर्व भागाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते आहे. जत पश्‍चिम भागात पाणी असल्याने शेतकऱ्यांच्यात समाधानाचे वातावरण आहे. 

सिंचन योजनेच्या क्षेत्रातील तलाव भरणार 
ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन सुरू आहेत. टेंभू उपसा सिंचन योजना पुढील आठवड्यात सुरू होईल. ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून लाभ क्षेत्रातील तलाव भरण्यात येणार आहेत. शेतकरी आणि पाणीपुरवठा संस्थांनी पाटंबधारे विभागाकडे तशी मागणी केली असून, तलाव भरून देण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या हालचाली आहेत. अशी माहिती पाटंबधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. तसेच तलावात पाणी हवे असल्यास पाणीपट्टी भरावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

Web Title: 26 percent water stock in medium and small projects in Sangli district