भाजपच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 273 जणांनी केले रक्तदान

273 people donated blood in BJP rally and blood donation camp
273 people donated blood in BJP rally and blood donation camp

अक्कलकोट : अक्कलकोट तालुका भारतीय जनता पक्ष आणि विवेकानंद परिवार यांच्या वतीने आज सोमवारी कै.पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त अक्कलकोट येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन हन्नूर रोडवरील कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात सकाळी साडेअकरा वाजता करण्यात आले होते. याचे उद्घाटन सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि आळंदचे आमदार सुभाष गुत्तेदार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी राज्य शिखर बॅँक संचालक अविनाश महागांवकर, पक्षनेते आनंद तानवडे, बाजार समितीचे नूतन संचालक रामप्पा चिवडशेट्टी, नूतन संचालक अप्पासाहेब पाटील, दुधनीचे नगराध्यक्ष भिमाशंकर इंगळे, जिल्हा परिषद सदस्य आणप्पा बाराचारी, उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, पक्षनेते महेश हिंडोळे, ,प्रभाकर मजगे, मल्लिनाथ स्वामी ,राजशेखर मसुती,अप्पू परमशेट्टी,गुंडप्पा पोमाजी,राजेंद्र बंदीछोडे,अनिल पाटील,कयूम पिरजादे,मंगलाताई कल्याणशेटटी, सुरेखा होळीकट्टी,मोतीराम राठोड, उपसभापती आप्पासाहेब पाटील ,बसवराज तानवडे,परमेश्वर यादवाड,प्रदीप पाटील,स्वामीनाथ नागुरे,अविनाश मडिखांबे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. 

प्रांरभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व पुष्पांजली अर्पण करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक भाजपा तालुकाध्यक्ष सचिन कल्याणशेटटी यांनी केले.

यावेळी बोलताना देशमुख म्हणाले, की केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे वंचितापर्यंत पोहोचविणे व समाजातील शेवटच्या माणसाला प्रवाहात आणणे हे प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांचे काम आहे. प्रत्येक गावातील बुथवरचा भाजपा कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजे तरच अक्कलकोट कॉग्रेसमुक्त होऊन भाजपाची निर्विवाद सत्ता प्रस्थापित होईल. भाजप हा पक्ष कोणा एका व्यक्तीची नसून सर्व कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. अनेकांचे त्याग,मेहनत व बलिदानातुन हा पक्षा उभा आहे.यावेळी पुढे बोलताना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी भाजपा सदस्य नोंदणीचे टोल फ्री क्रमांक १८००२६६१००१ नंबर सांगून मिस कॉल देण्यास सांगितले व भाजपाचा सदस्य होण्यास सांगितले.

भाजप तळागाळात पोहोचविण्यासाठी बुध प्रमुखांनी भाजपाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याची गरज असल्याचे सांगितले व कोणाला तिकीट मिळेल याकडे लक्ष न देता कार्यकर्तांनी कॉग्रेसमुक्त करण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन केले. याच कार्यक्रमात मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महिला महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून सुरू झालेल्या एम.ए.,एम.कॉम अभ्यासक्रमाचा शुभारंभ, तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण आणि असंघटित बांधकाम कामगारांना कार्ड वाटपाचा कार्यक्रम व रक्तदान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. 

यावेळी नगरपरिषद पक्षनेते महेश हिंडोळे,परमेश्वर यादवाड,आनंद तानवडे,दुधनीचे नगराध्यक्ष भिमाशंकर इंगळे,मल्लिनाथ स्वामी,सुरेखा होळीकटटी ,आमदार सुभाष गुत्तेदार यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी बोलताना आळंदचे आमदार सुभाष गुत्तेदार यांनी मी बुथ लेव्हलवर केलेल्या कामांमुळेच प्रतिकूल परिस्थितीतही आमदार झालो आहे, असे सांगून कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेवरील दुबार मतदान नोंदणीबाबत दोन्ही मतदार याद्यांचे अवलोकन करून कमी करण्यात येईल, असे सांगितले. सचिन कल्याणशेटटी यांना आमदार करण्यासाठी सर्वाँनी काम केले पाहिजे, असे सांगितले. दुधनीचे नगराध्यक्ष भिमाशंकर इंगळे यांनी बोगस मतदारांबद्दल चिंता व्यक्त करून आमदर सुभाष गुत्तेदार व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी लक्ष घालण्याबददल विनंती केली. सकाळी नऊ ते सायंकाळी 4 पर्यंत रक्तदान शिबिर पार पडेल. यामध्ये २७३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सूत्रसंचालन नितीन पाटील व बापुजी निंबाळकर यांनी केले तर आभार उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com