महापालिका क्षेत्रातील 210 जणासह 278 "पॉझिटीव्ह'...दिवसभरात सहाजणांचा मृत्यू 

घनशाम नवाथे
Wednesday, 5 August 2020

सांगली-  जिल्ह्यात आज कोरोनाचे आणखी 278 रूग्ण आढळले. त्यापैकी महापालिका क्षेत्रातील 210 रूग्ण आहेत. जिल्ह्यातील एकुण रूग्णसंख्या 3750 इतकी झाली आहे. आज सांगलीतील दोन रूग्ण आणि आष्टा, मिरज, बोरगाव (ता. कवठेमहांकाळ), कुपवाड येथील प्रत्येकी एक रूग्ण अशा सहाजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर आज दिवसभरात 91 रूग्ण कोरोनामुक्त झाले. 

कोरोना रूग्णांची संख्या वाढत असून आज झालेल्या तपासणीमध्ये सायंकाळी साडे पाचपर्यंत नवे 278 रूग्ण आढळले. त्यापैकी सांगलीत 138 आणि मिरजेतील 72 रूग्ण बाधित असल्याचे आढळले. महापालिका क्षेत्रात आज 210 रूग्ण आढळून आले. तर ग्रामीण भागात जत तालुक्‍यात, कवठेमहांकाळ तालुक्‍यात 25, खानापूर तालुक्‍यात 9, मिरज तालुक्‍यात 13, पलूस तालुक्‍यात 2, शिराळा तालुक्‍यात 7, तासगाव तालुक्‍यात 9, वाळवा तालुक्‍यात 2 रूग्ण बाधित आढळले. 

आज दिवसभरात आष्टा येथील 80 वर्षीय वृद्ध, मिरजेतील 62 वर्षीय वृद्ध, बोरगावमधील 90 वर्षाचे वृद्ध, सांगलीतील हनुमाननगरमधील 55 वर्षीय महिला, सांगलीतील 46 वर्षीय महिला आणि कुपवाडमधील 55 वषीय महिला अशा सहा रूग्णांचा मृत्यू झाला. आजअखेर सांगली जिल्ह्यात 113 मृत झाले आहेत. तर बाहेरील जिल्ह्यातून आणि परराज्यातून दाखल झालेल्या रूग्णांपैकी 36 जण मृत झाले आहेत. 
जिल्ह्यात सद्यस्थितीत 1919 रूग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी 35 पॉझिटीव्ह रूग्ण चिंताजनक आहेत. तर दिवसभरात 91 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 1579 रूग्ण आजअखेर बरे झाले आहेत. एकुण रूग्णसंख्या 3750 इतकी झाली आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 278 "positive" including 210 people in the municipal area . 6 people died in a day