सोलापुरात २९ जणाना डेंगीची लागण  

SOLAPUR DEGUE
SOLAPUR DEGUE

सोलापूर : शहरात २९ जणाना डेंगीची लागण झाली आहे. डेंगी डासाची उत्पत्ती होऊ नये, यासाठी महापालिका हिवताप विभागाने शहराच्या विविध भागांत डास उत्पत्ती प्रतिबंधक औषधाची फवारणी आणि धुरावणी सुरू केली आहे.

 बांधकामाच्या ठिकाणी पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्याच्या नोटीसा संबंधितांना देण्यात येणार आहेत. डेंगी रुग्णाच्या संख्येत वाढ झाल्याचे वृत्त "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाल्यावर यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे. 

गेल्या महिनाभरात शहरात डेंगीसदृश्‍य आजाराचे लागण झालेले 119 रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर ही दक्षता घेण्यात आली आहे. मुस्लिम पाच्छा पेठ, तेलंगी पाच्छा पेठ, जुने विडी घरकुल, भवानी पेठ, कुमठा नाका, एकतानगर, होटगी रस्ता या परिसरातील रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या सर्व ठिकाणी धुरावणी व फवारणी करण्यात येत आहे. 

बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी बेसमेंटमध्ये पाणी साठविण्यात येते. स्लॅबसाठी पाण्याच्या पिशव्या लावण्यात येतात. सेंट्रिंगच्या ठिकाणीही पाणी साचते. या ठिकाणी डासांची उत्पत्ती होण्याची सर्वाधिक शक्‍यता असते. त्यामुळे पाणी साचणार नाही, याची दक्षता घेण्याच्या नोटिसा संबंधितांना देण्यात येणार आहेत. बांधकामे सुरू असलेल्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना जास्त धोका असणार आहे. त्यामुळे त्यांनी सावधगिरी बाळगावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

असा आहे डेंगीसंदर्भातील अहवाल 
कालावधी संशयित पॉझिटिव्ह 
जानेवारी ते जुलै 2018 205 45 
1 ते 23 ऑगस्ट 2018 119 29 

हा आजार कोणालाही होऊ शकतो, मात्र प्रामुख्याने लहान मुलांना संसर्गाचा अधिक धोका आहे. डेंगीची लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या डॉक्‍टरांशी संपर्क साधावा. स्वतःच्या मनाने ऍस्पिरीन, वेदनाशामक आणि झटके प्रतिबंधक औषधे घेऊ नयेत. संपूर्ण विश्रांती (बेड रेस्ट) घ्यावी. 
- स्वाती इंगळे, जीवशास्त्रज्ञ, महापालिका हिवताप विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com