इस्लामपूरसाठी 3 कोटी 45 लाख; NCP पदाधिकाऱ्यांची माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इस्लामपूरसाठी 3 कोटी 45 लाख; NCP पदाधिकाऱ्यांची माहिती

इस्लामपूरसाठी 3 कोटी 45 लाख; NCP पदाधिकाऱ्यांची माहिती

इस्लामपूर : गेल्या सव्वा वर्षात मंत्री झाल्यापासून पालकमंत्री जयंत पाटील (jayant patil) यांच्या माध्यमातून इस्लामपूर शहराची (islampur city) थांबलेली विकासाची गती पुन्हा गतिमान झाला आहे. असा दावा करत मंत्री पाटील यांनी आणखी ३ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिल्याची माहिती राष्ट्रवादीचे (NCP) शहराध्यक्ष शहजी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. नगराध्यक्ष (mayor) सभागृहात खोटी माहिती देऊन नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते प्रा. शामराव पाटील, बी. ए. पाटील, गटनेते संजय कोरे, माजी नगराध्यक्ष भगवानराव पाटील, ऍड. चिमन डांगे, अरुणादेवी पाटील, उपनगराध्यक्ष दादासो पाटील, सभापती विश्वनाथ डांगे, नगरसेवक खंडेराव जाधव, सुभाष सूर्यवंशी, संदीप पाटील, पीरअली पुणेकर, शंकर चव्हाण प्रमुख उपस्थित होते.

शहाजी पाटील म्हणाले, 'चार वर्षात शहराची विकास गती थांबली होती. राज्यात आघाडी सरकारमध्ये (mahavikas aghadi) जयंत पाटील मंत्री झाल्यानंतर त्यांनी सुरवातीला दोनवेळा पाच कोटी आणि आता साडेतीन कोटी असे एकूण साडेतेरा कोटींचा निधी दिला. जिल्हा नियोजनमधून त्यांनी आणखी पंधरा कोटींची कामे दिली होती. मात्र नगराध्यक्षांनी ती होऊ दिली नाहीत.

हेही वाचा: नक्षलवादीविरोधात लढणाऱ्या अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांवर कोरोनाचा हल्ला

पूर्वी एकेका दिवसात विशेष सभा घेऊन विकासकामांच्या मंजुरीचे ठराव दिले जायचे. परंतु नगराध्यक्षांनी डिसेंबरपासून मार्चपर्यंत दिरंगाई करत या कामांचा खेळ केला. ते १५ कोटी येणारे थांबले. आता नव्याने मंजूर झालेल्या साडे ३ कोटींच्या १६ कामांसाठी सभागृहाच्या ठरावाची गरज नाही. त्यामुळे ही कामे विनाअडथळा सुरू होतील.'

ऍड. चिमन डांगे म्हणाले, 'मंत्री पाटील यांनी बुथनिहाय बैठका घेऊन नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यांच्या मागणीनुसार हा निधी उपलब्ध करून दिला आहे.' सभापती विश्वनाथ डांगे म्हणाले, 'सत्ताधाऱ्यांनी साडे चार वर्षांत अवघे १२ कोटी रुपये आणले असावेत, मंत्री पाटील यांनी सव्वा वर्षात साडेतेरा कोटी दिले.' सभागृहात होणाऱ्या सभांमध्ये विकासकामांचे ठराव न होता फक्त चर्चाच होत असल्याचा आरोप खंडेराव जाधव यांनी केला.

हेही वाचा: हापूस आंब्याला नाव कसं पडलं? जाणून घ्या रंजक इतिहास

...फक्त दिशाभूल केली जाते!

सभागृहाचे पावित्र्य जपले जात नाही. फक्त खोटे, चुकीचे बोलून दिशाभूल केली जात असल्याचा हल्ला शहाजी पाटील आणि खंडेराव जाधव यांनी केला. ते म्हणाले, 'भुयारी गटर योजनांची थांबलेली कामे पुन्हा सुरू करण्याच्या विषयावर काही नगरपालिकांनी शासनाकडून २४ तासात परवानग्या आणून कामे सुरू केल्याची खोटी माहिती नगराध्यक्षांनी दिली. त्या पालिकांची नावे विचारूनही त्यांनी सांगितली नाहीत. त्यावर ते नुसतेच रेटून बोलले. ते खरे असल्यास त्यांनी ती नावे जाहीर करावीत.'

loading image
go to top