पंढरपुरातील व्यापाऱ्यांना तीन कोटींचा गंडा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

पंढरपूर - पश्‍चिम बंगालच्या एका बड्या डाळिंब व्यापाऱ्याने पंढरपूर येथील जवळपास 30 अन्य व्यापाऱ्यांना सुमारे तीन कोटी रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तीन महिन्यांपासून हा बंगाली बाबू येथील व्यापाऱ्यांच्या हातवर तुरी ठेवून पसार झाला आहे. जाकीर नामक व्यापाऱ्याकडून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच स्थानिकांची धावधाव सुरू झाली आहे. दरम्यान याबाबत अद्याप कोणीही पोलिसांत तक्रार देण्यास पुढे आलेले नाही. पंढरपूर येथील डाळिंब बाजारात दररोज कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होते. पश्‍चिम महाराष्ट्रात येथील बाजार समिती डाळिंबासाठी प्रसिद्ध आहे. येथील बाजारात डाळिंब खरेदीसाठी पश्‍चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात यांसह देशाच्या विविध राज्यांतून व्यापारी येतात.
Web Title: 3 Crore rupees Cheating in Pandharpur Businessman