सांगलीत कोरोनाचे नवे 30 रुग्ण; 15 कोरोनामुक्त 

शैलेश पेटकर 
Thursday, 14 January 2021

सांगली : जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाचे 30 नवे रुग्ण आढळून आले. महापालिका क्षेत्रात 10 जणांना बाधा झाली. 15 जण कोरोनामुक्त झाले. उपचारादरम्यान कडेगाव तालुक्‍यातील एकाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील बाधितांची संख्या 47 हजार 864 झाली. 

सांगली : जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाचे 30 नवे रुग्ण आढळून आले. महापालिका क्षेत्रात 10 जणांना बाधा झाली. 15 जण कोरोनामुक्त झाले. उपचारादरम्यान कडेगाव तालुक्‍यातील एकाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील बाधितांची संख्या 47 हजार 864 झाली. 

आज 297 जणांची आरटीपीसीआर तपासणी झाली. त्यात 20 बाधित आढळले. 7180 जणांची अँटीजेन तपासणी केली. त्यात 10 जण बाधित आढळले. जत तालुक्‍यात 5, कवठेमहांकाळमध्ये 4, खानापूर एक, पलूस तालुक्‍यात दोन, तासगाव तालुक्‍यात पाच, तर वाळवा तालुक्‍यातील तीन जणांना बाधा झाली. महापालिका क्षेत्रात सांगली शहरात सात, तर मिरज शहरात तिघंना बाधा झाली. 

सध्याची स्थिती अशी 

आजचे बाधित ः 30, उपचाराखाली ः 228, बरे झालेले ः 45 हजार 897, मृत्यू ः 1739, बाधित ः 47 हजार 864, चिंताजनक 52, ग्रामीण बाधित ः 24 हजार 225, शहरी बाधित ः 7 हजार 125, मनपा क्षेत्रात बाधित 16 हजार 514. 

नेर्ले येथे दोघा जणांना कोरोना 
नेर्ले : येथे दोघांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती नेर्ले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर शिंदे यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी इस्लामपूर येथील खाजगी दवाखान्यात या दोघा पुरुषांवर आजारी असल्याने उपचार सुरू होते. यावेळी या दोघांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती डॉ. सागर शिंदे यांनी दिली.

घरातील अति संपर्कातील 19 लोकांची आज अँटिजन चाचणी घेण्यात आली. त्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. या कुटुंबाना अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. लोकांनी सर्दी, ताप, खोकला जाणवल्यास व मधुमेह तसेच वयस्कर लोकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र नेर्ले येथे संपर्क साधावा. मागील चार दिवसांपूर्वी वाळवा तालुक्‍यातील तांबवे गावात दहा रुग्ण सापडले होते. त्यामुळे तालुक्‍यात खळबळ उडाली होती. त्यानंतर नेर्ले येथील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या परिसरात आरोग्य कर्मचारी व आशा सेविकांनी सर्व्हे सुरू केला आहे.
 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 30 new patients of Sangli Corona; 15 coronal free