बार्शी तालुक्यात विषबाधेने 30 मोरांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

बार्शी तालुक्यातील मालेगावमध्ये जवळपास 30 मोरांसह काही पक्षांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विष असलेलं धान्य खाल्याने या मोरांचा  मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

बार्शी (सोलापूर)- बार्शी तालुक्यातील मालेगावमध्ये जवळपास 30 मोरांसह काही पक्षांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विष असलेलं धान्य खाल्याने या मोरांचा  मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या विषबाधेत मोरांसोबत सातभाई आणि भारद्वाज सारखे इतर पक्षीही मृत्यूमुखी पडले आहेत. ही घटना दोन ते तीन दिवसांपूर्वी घडली असल्याचा अंदाज असून आज सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यांना खाण्यासाठी पुरवल्या जाणाऱ्या ज्वारी आणि मक्याच्या दाण्याला विष लावून कोणीतरी हे कृत्य केले आहे का याचा तपास सध्या वनविभाग आणि पोलिस करत आहेत.

Web Title: 30 peacock deaths due to poisoning in Barshi taluka