कोयनेतून 30 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

30 thousand cusecs of water released from Koyna
30 thousand cusecs of water released from Koyna

कऱ्हाड : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात रिमझिम पाऊस सातत्याने पडत असल्याने जलाशयात 26 हजार 654 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. कोयना धरणात सध्या 104.06 टिएमसी पाणी साठा आहे. परिणामी रात्री 11.30 वाजता धरणाचे दरवाजे तीन फुटावर नेण्यात आले आहेत. त्यामुळे धरणातुन 30 हजार 366 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना होत आहे.

चोवीस तासात नवजाला 38, महाबळेश्वरला 23 व कोयनेल 17 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नवजाच्या पावसाने 22 व 26 ऑगस्टला कोयनानगरच्या आणि महाबळेश्वरच्या पावसाने पाच हजार मिलीमीटरचा टप्पा आोलांडला. चार दिवसापुर्वी पावसाने उघडीप दिली होती. मात्र पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाची रिमझिम सुरु झाल्याने सोमवारी सकाळी सहा वाजता पाणीसाठा नियंत्रणासाठी धरण व्यवस्थापणाने दरवाजे एक फुटाने उचलले. रात्री पासुन पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने रात्री साडेआठ वाजता दरवाजे अर्धा फुटाने व 11.30 वाजता तीन फुटावर नेण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com